|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पेपरलेस कारभारात सोलापूर राज्यात नंबर 1

पेपरलेस कारभारात सोलापूर राज्यात नंबर 1 

गणेश क्षीरसागर/ सोलापूर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थानला दाखवलेले डिजीटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकारनेदेखील पाऊले उचलली आहेत. डिजीटल महाराष्ट्र करण्यासाठी सरकार  प्रयत्नशील आहे. राज्य सरकारच्या या प्रयत्नाला सोलापूर जिल्हा परिषदेने प्रतिसाद देत, आपला कारभार डिजीटल करण्यासाठी अट्टाहास मांडला आहे. याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिह्यातील 131 ग्रामपंचायती आपले सरकार सेवा केंद अंतर्गत पूर्णपणे संकणीकृत आहेत. या हायटेक ग्रामपंचायतींचा सर्व कारभार आता संगणकावरच चालवला जात आहे. या ग्रामपंचायतींची कामकाजाची कालबाह्य पध्दती जावून या ग्रामपंचायती पेपरलेस झाल्या आहेत. पेपरलेस ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये सोलापूर जिल्हा राज्यामध्ये अव्वलस्थानी ठरला असून, या जिल्हा परिषदेच्या पेपरसेल कारभाराचा नवा पॅटर्न राज्यापुढे आदर्श म्हणून आला आहे.

महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती संगणकीकृत करण्याचा आपले सरकार सेवा केंद्र हा उपक्रम आहे. या अर्तंगत सोलापूर जिह्यात ग्रामपंचायतीचे कामकाज संगणकीकृत करण्याकरीता ’ई-ग्राम’ सॉफ्टचा वापर करण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत.

या ई-ग्राम सॉफ्टचा उद्देश ग्रामपंचायताकडील सर्व 1 ते 33 नोंदी अद्ययावत करणे, तसेच 1 ते 19 प्रकारचे संगणीकृत दाखले नागरिकांना हा आहे. जेणे करुन ग्रामपंचायतींनी यापुढे त्यांचे कोणतेही कामकाज हस्तलिखीत न करता संगणकाद्वारेच करण्याची योजना आहे. या योजनेच्या अनुषंगाने ज्या ग्रामपंचायतींनी त्यांचे सर्व लेखे ई-ग्राम सॉफ्टमध्ये अद्ययावत केले आहेत. अशा ग्रामपंचायतींचे 1 ते 33 नोंदवह्या पंचायत समिती कार्यालयामाफ्&ढत सीलबंद करुन पंचायत समिती कार्यालयात जमा करुन घेण्याचे निर्देश होते. 

या योजनेची अंमलबजावणी करताना जे सॉफ्टवेअर वापरण्यात येईल त्याला इंटरनेटची गरज नसल्याने सर्वच ग्रामपंचायतींमध्ये याचा वापर करणे सोपे आहे. शिवाय सरकारकडून याचा वापर करणे बंधनकारकही करण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिह्यात सध्या 131 ग्रामपंचायतींनी त्यांचे सर्व कामकाज संगणीकृत करुन ग्रामपंचायतींना पेपरलेस केलेले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी जिह्यातील सर्वच ग्रामपंचायती पेरपलेस करण्यासाठी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. तशा सूचना तालुका पातळीवरील सर्व गट विकास अधिकाऱयांना दिल्या आहेत. त्याचबरोबर डॉ. भारुड यांनी स्वतः मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी या ग्रामपंचायतीला भेट देत पेपरलेस कामकाजाची पाहणी केली आहे.

पेपरलेसमध्ये बार्शीची सरशी

पेपरलेस ग्रामपंचायत करण्यामध्ये जिह्यात बार्शी तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यामध्ये 37 ग्रामपंचायती पेपरलेस झाल्या आहेत. त्याखालोखाल दक्षिण सोलापूर 19, माळशिरस 15, मंगळवेढा व सांगोला 12, माढा 11, उत्तर सोलापूर व पंढरपूर 6, अक्कलकोट व मोहोळ 5 आणि सर्वात कमी करमाळा तालुक्यात केवळ 3 ग्रामपंचायती पेपरलेस झाल्या आहेत.

Related posts: