|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » प्रभागातील सर्वसमान्य विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करणार

प्रभागातील सर्वसमान्य विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करणार 

प्रतिनिधी /सातारा :

सातारा पालिकेच्या ज्ञानगंगा विद्यामंदिर या शाळेला भौतिक सुविधा देण्यासाठी
प्रयत्न करणार आहे. विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता शालेय इमारतीसह त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून जवळजवळ 20 वर्षांनी या प्रशालेला रंग मिळतोय. शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचे भाजपाचे नगरसेवक विजय काटवटे यांनी आश्वासन दिले.

    ज्ञानगंगा विद्यामंदिर नगरपालिका शाळा क्र. 6 कात्रे वाडा, सातारा येथे शाळेच्या नवीन रंगकामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक विजय नाफड, ढेकणे, शाळा क्र. 6 चे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अभियंते नंदकुमार माने उपस्थित होते.

  विजयकुमार काटवटे म्हणाले, शाळेच्या विकासाकरिता पालिकेच्या माध्यमातून जवळजवळ 20 वर्षांनी या प्रशालेला रंग मिळतोय. शालेय इमारतीच्या रंगरंगोटी
प्रमाणेच इतर कामेही प्रस्तावित आहेत. भौतिक सुधारणाही केली जाणार आहे. यामध्ये शालेय सुरक्षिततेसाठी गेट, वॉल चेनलिंग जाळी, दुमजली इमारतीला
ग्रिलींग, शालेय मैदानाचे विकसन, बोलक्या भिंती, वॉकिंग ट्रक, विद्यार्थ्यांसाठी ओपन जिम, खेळणी, शालेय सुशोभन ही कामेही लवकरच सुरू होतील. तसेच शालेय सुरक्षिततेसाठी लवकरच शालेय आवारात सीसीटीव्ही कॅमेरेहीइट बसविले जातील. मैदानावर नवीन व्यासपीठ देखील उभारले जाणार आहे. पालिकेच्या माध्यमातून व शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालय विभागाकडून जास्तीत जास्त निधी आणून शाळेचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. पूर्वीच्या कात्रेवाडा शाळेचे रूप बदलून सर्वसामान्यांच्या मुलांना सर्व सुविधांनी युक्त शिक्षण देण्याचा आमचा मानस असणार आहे. तरी प्रभागातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या  उज्वल भविष्यासाठी सहकार्य करावे. असे त्यांनी आवाहन केले.a