|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जि.प.च्या दिव्यांग उन्नती अभियानास गती

जि.प.च्या दिव्यांग उन्नती अभियानास गती 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

 कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत यंदा ‘दिव्यांग उन्नती अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिह्यातील सर्व दिव्यांगांची नोंदणी, तपासणी करुन अपंगत्वाचे प्रमाणपत्र, शासकीय योजनांचा लाभ आणि संदर्भ सेवा देवून अपंगत्वावर मात करण्यास मदत केली जाणार आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा स्तरीय कार्यशाळेनंतर आता तालुकास्तरीय व ग्रामपंचायत पातळीवर कार्यशाळा आयोजित केल्या जात असून त्यामध्ये  अभियानाची रुपरेषा प्रभावीपणे सांगितली जात आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिह्यातील सर्वच घटकांनी सक्रीय योगदान द्यावे असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

    दिव्यांग उन्नती अभियानाची चार टप्प्यात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात  जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करुन या अभियानाची माहिती व उद्देश सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱयांना पटवून दिली जाणार आहे. जिल्हास्तरीय कार्यशाळेपाठोपाठ सध्या तालुकास्तरीय व ग्रामपंचायचत पातळीवर कार्यशाळा आयोजित करुन या अभियानाची रुपरेषा गावपातळीपर्यंत प्रभावीपणे सांगितली जात आहे. दिव्यांग उन्नती अभियानास 7 जुलैपासून प्रत्यक्ष सुरुवात करुन प्रथम सर्व्हेचे होणार आहे. या दिवशी दिव्यांग व्यक्तींची नोंदणी व फॉर्म भरून घेऊन 8 ते 15 जुलै या कालावधीत दिव्यांग व्यक्तींचे भरलेले फॉर्म ऑनलाईन करण्यात येणार आहेत. या अभियानाच्या दुसऱया टप्प्यात 21 जुलै रोजी सनियंत्रण समितीची बैठक घेतली जाणार आहे. तिसऱया टप्प्यात सप्टेबर, ऑक्टोबरमध्ये तालुकास्तरावर तपासणी शिबिराचे आयोजन करून दिव्यांगांसाठी साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर चौथ्या टप्प्यात दिव्यांगांना उपचार व संदर्भसेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्वनिधीतून 3 टक्के खर्चाचे नियोजन करून ऑक्टोबर व नोव्हेबमध्ये शासकीय योजनांसाठी मेळाव्याचे आयाजन केले  आहे. त्यानंतर 3 डिसेंबर रोजी साहित्य वाटप मेळावा होणार आहे.

Related posts: