|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडा इंदिरा मार्केटमधील हातगाडे पुन्हा फुटपाथवर

फोंडा इंदिरा मार्केटमधील हातगाडे पुन्हा फुटपाथवर 

प्रतिनिधी /फोंडा :

जुने बसस्थानक, इंदिरा मार्केट परिसरातील खाद्य पदार्थांचे हातगाडे पुन्हा फुटपाथवर आल्याने पादचारी व वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ लागला आहे. फोंडा पालिकेने या हातगाडय़ांवर कारवाई करण्याची मागणी गोवा फॉरवर्डतर्फे करण्यात आली आहे. ा गोवा फॉरवर्डच्या शिष्टमंडळातर्फे गुरुवारी पालिका मुख्याधिकारी नवनाथ नाईक यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली.

 यावेळी राजेश वेरेकर, दुर्गादास कामत, कुर्टी खांडेपारचे उपसरपंच शैलेश शेट व मधुसूदन बोरकर हे उपस्थित होते. पालिका निवडणुकीपूर्वी खाद्य पदार्थांचे हे गाडे इंदिरा मार्केटमध्ये एकाच ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले होते. ज्यामुळे शहरातील वाहतुकीमधील अडथळय़ांवर नियंत्रण आले होते. गेल्या काही दिवसापासून पुन्हा हे गाडे फुटपाथवर आल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. पालिकेने पुन्हा हे हातगाडे इंदिरा मार्केटमध्ये पिंवा इतर कुठल्या सुरक्षित जागेत हलवावे. हे गाडे पुन्हा फुटपाथवर आणण्यामागे कुणाचा स्वार्थ असल्यास मुख्याधिकाऱयांनी कुठल्याच दबावाला बळी न पडता या हातगाडय़ांचे स्थलांतर करण्याची मागणी त्यांनी केली.

Related posts: