|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » धुंवाधार पावसाने सतरी तालुक्यातील नैसर्गिक पडझड

धुंवाधार पावसाने सतरी तालुक्यातील नैसर्गिक पडझड 

प्रतिनिधी /वाळपई :

गेल्या दोन दिवसांपासून वाळपई तसेच ग्रामीण भागांमध्ये पडणाऱया धुंवाधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी भरण्याचे प्रकार आढळून आले असून बुधवारी रात्री गोवा, कर्नाटक दरम्यानच्या चोर्ला घाट परिसरामध्ये झाड कोसळल्याने जवळपास एक तास वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार घडला. मात्र वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेने त्वरित धाव घेऊन रस्ता मोकळा केल्याने दरम्यानची वाहतूक सुरळित होण्यास मदत झाली.

यासंदर्भाची माहिती अशी की, गेल्या दोन दिवसांपासून सतरी तालुक्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात पावसाची संततधार सुरू असून या भागातील वेगवेगळ्या नद्या दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गुरुवारी दुपारी 3.50 वा. दरम्यान तालुक्याच्या काही भागात वादळाचा फटका बसून अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याचे प्रकार पाहावयास मिळाले. सध्या तरी कोणत्याही प्रकारची नुकसानीची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. तरीसुद्धा सकाळी होंडा-वाळपई दरम्यानच्या मार्गावर रेडीघाट या ठिकाणी झाड पडल्याने वाहतुकीला बऱयाच प्रमाणात व्यत्यय निर्माण झाला. यामुळे अग्निशामक दलाच्या यंत्रणेने धाव घेऊन रस्ता मोकळा केल्याने वाहतूक पूर्ववत सुरू होण्यास मदत झाली. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असून डोंगराळ भागामध्ये पावसाची संततधार सुरूअसल्याने वेगवेगळ्या नद्यांना मोठय़ा प्रमाणात पाणी आल्याचे पाहायास मिळाले. काही नद्यांच्या जलस्तर वाढत असून सध्या तरी कोणत्या प्रकारची भीतीनसल्याचे वालपई जलस्रोत खात्याच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत असल्याने अंजने धरणाच्या जलाशयात मोठय़ा प्रमाणात पाण्याचा साठा होऊ लागला असून पाण्याचीपातळी हळुहळू वाढत असल्याचे धरण विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, तालुक्यातील गटार व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने दोन दिवसांपासून पडणाऱया पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली जाण्याचे प्रकार पाहावयास मिळत आहेत. यामुळे नागरिकांनी तीव्र स्वरुपाची नाराजी व्यक्त केली असून गटारव्यवस्थेकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Related posts: