|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » मनोरंजन » मित्रांची धमाल गोष्ट इपितर

मित्रांची धमाल गोष्ट इपितर 

प्रत्येकजण कॉलेजविश्वात थोडासा ‘इपितर’ असतो. तरुणपणातला हा ‘इपितर’पणाचं काहीतर नवं करायचं स्फुरण देतं. असेच तीन ‘इपितर’ पुढच्या महिन्यात 13 तारखेला आपल्याला भेटणार आहेत. परश्या, बॉब्या आणि आर्थिंग्याची ही कथा आहे. चित्रपटाचे नुकतेच ऑफिशिअल पोस्टर रिलीज झाले आहे.

चित्रपटाविषयी सांगताना निर्माते-लेखक किरण बेरड सांगतात, महाराष्ट्रात महाविद्यालये जून-जुलैमध्ये सुरू होतात. आणि मग खऱया अर्थाने जुलै महिन्यातच मैत्री फुलते. निसर्ग फुलतो. या मैत्रीतल्या इपितरपणाचा आलेख जुलैपासूनच चढत जातो. म्हणून रुपेरी पडद्यावर 13 जुलैला इपितर चित्रपट रिलीज करायचा आम्ही विचार केला. चित्रपटाचे दिग्दर्शक-सहनिर्माते दत्ता तारडे म्हणतात, हा चित्रपट कॉलेजविश्वात इरसालपणा केलेल्या प्रत्येक तरुणाचं प्रतिनिधीत्व करतो. चित्रपट पाहताना तुम्हाला तुमच्या कॉलेज जीवनातला इपितरपणा नक्की आठवेल. डॉ. सोनाली पाटील रॉय आणि डॉ. संदीप रॉय प्रस्तुत इपितर चित्रपटाची निर्मिती नितीन कल्हापूरे आणि किरण बेरड यांनी केली आहे. सुधीर बोरूडे, दत्ता तारडे आणि विकास इंगळे यांची सहनिर्मिती असलेल्या इपितर या विनोदी चित्रपटाचे लेखन किरण बेरड यांनी केले असून दिग्दर्शन दत्ता तारडे यांनी केले आहे. भारत गणेशपुरे, मिलिंद शिंदे, प्रकाश धोत्रे, जयेश चव्हाण, विजय गीते, गणेश खाडे, निकिता सुखदेव, वफंदा बाळ आणि सुहास दुधाडे यांच्या मुख्य भूमिका असलेला इपितर हा चित्रपट 13 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात झळकणार आहे.

Related posts: