|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » मनोरंजन » ड्राय डेमध्ये ब्रेकअप नंतरची गोष्ट

ड्राय डेमध्ये ब्रेकअप नंतरची गोष्ट 

आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘ड्राय डे’ हा चित्रपट येत्या 13 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आगळय़ा – वेगळय़ा ड्राय डेची धम्माल गोष्ट घेऊन येत आहे. तरुणाईवर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या सोशल नेट्वर्किंग साईटवर एक नवा कोरा ट्रेलर आणि पोस्टर लाँच करण्यात आला.

मद्याच्या एका धुंद रात्रीची गोष्ट सांगणाऱया या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये ऋत्विक पेंद्रे आणि मोनालिसा बागल यांची केमिस्ट्री पाहायला मिळते. पण, त्यासोबतच पोस्टरवरील दारूची बाटलीदेखील आपले लक्ष वेधून घेते. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येदेखील हीच गम्मत दिसून येत असून, चार मित्रांची धम्माल-मस्ती दाखवणाऱया या ट्रेलरमधून आजच्या तरुण पिढीची चंगळ आणि आयुष्य जगण्याची त्यांची मनमौजी वफत्ती आपल्याला दिसून येते. तसेच ऋत्विक-मोनालिसा या फ्रेश जोडीचा रोमान्स जरी यात असला तरी ब्रेकअप नंतरची धम्मालदेखील यामध्ये बघायला मिळते. रात्रीची धम्माल पार्टी आणि त्यातून उलगडत जाणारी या चित्रपटाची गोष्ट प्रेक्षकांना चित्रपटगफहात खिळवून ठेवेल अशी आहे. ड्राय डेच्या या मजेशीर ट्रेलरबरोबरच दारू डिंग डांग, अशी कशी आणि गोरी गोरी पान ही गाणीदेखील तुफान गाजत आहे. आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारा हा चित्रपट एक अनोखा ड्राय डे प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनीच या चित्रपटाचे लेखन केले आहे. तर नितीन दीक्षित यांनी या चित्रपटाचे पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. या चित्रपटात कैलाश वाघमारे, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी, आयली घिए, सानिका मुतालिक, अरुण नलावडे आणि जयराम नायर आदी कलाकारदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ब्रेकअप नंतरच्या खऱया धम्माल पार्टीचा आनंद लुटण्याचा अनुभव घेण्यासाठी 13 जुलैपर्यंत वाट पहावी लागेल.

Related posts: