|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » क्रिडा » रशियाचा इग्नेशेव्हिच निवृत्त

रशियाचा इग्नेशेव्हिच निवृत्त 

वृत्तसंस्था/ मॉस्को

यजमान रशियाला सध्या सुरू असलेल्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत क्रोएशियाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत व्हावे लागले. या पराभवामुळे रशियाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

रशियन फुटबॉल संघातील मध्यफळीत खेळणाऱया अनुभवी 38 वर्षीय सर्जी इग्नेशेव्हिचने रविवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून आपली निवृत्ती जाहीर केली. इग्नेशेव्हिचने 127 सामन्यात रशियाचे प्रतिनिधीत्व करताना एकूण 9 गोल नोंदविले आहेत. रशियाच्या राष्ट्रीय संघाकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा इग्नशेव्हिचने विक्रम केला आहे.