|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » क्रिडा » थायलंड ओपनमध्ये भारताची मदार सायना, सिंधूवर

थायलंड ओपनमध्ये भारताची मदार सायना, सिंधूवर 

वृत्तसंस्था/ बँकॉक

350,000 अमेरिकन डॉलर्स बक्षीस रकमेच्या प्रतिष्ठित थायलंड ओपन स्पर्धेला आज मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. अपेक्षेप्रमाणे, भारताची मदार स्टार खेळाडू सायना नेहवाल, पीव्ही सिंधू व किदाम्बी श्रीकांत यांच्यावर असणार आहे. मलेशियन मास्टर्स व इंडोनेशिया ओपनमधील अपयश मागे टाकत भारतीय बॅडमिंटनपटूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

अलीकडेच झालेल्या प्रतिष्ठित मलेशियन मास्टर्स व इंडोनेशिया ओपन स्पर्धेत एकाही भारतीय बॅडमिंटनपटूला अपेक्षित यश मिळाले नव्हते. पुढील महिन्यात इंडोनेशिया येथे होणारी आशियाई स्पर्धा पाहता भारतीय खेळाडूंना तयारीसाठी ही शेवटची स्पर्धा असेल. पुरुषांत प्रणॉयची सलामीची लढत स्पेनच्या ऍडियनशी होईल. युवा खेळाडू समीर वर्माचा सामना थायलंडच्या सेनसोमबुन्सुकशी तर पारुपल्ली कश्यपचा मुकाबला चीनच्या बलाढय़ शेई युकीशी होईल.

महिलांत सिंधूसमोर सलामीला बल्गेरियाच्या झेत्रेचीचे आव्हान असणार आहे. सायना नेहवालची लढत थायलंडच्या बिगरमानांकित ओगुंडमन्सनशी होणार आहे. याशिवाय, पुरुष दुहेरीत मनु अत्री-बी सुमित रेड्डी व अर्जुन-श्लोक यांच्यावर भारताची कमान असेल.

Related posts: