|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आलखनूर येथील तरुणीवर बलात्कार

आलखनूर येथील तरुणीवर बलात्कार 

प्रतिनिधी/ बेळगाव

आलखनूर (ता. रायबाग) येथील एका तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी हारुगेरी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले असून पिडीत तरुणीला रविवारी रात्री वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

17 मे ते 2 जुलैपर्यंत एका 19 वषीय तरुणीला घरात कोंडून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. हा प्रकार कुणाला सांगितलीस तर तुला संपवितो, अशी धमकीही देण्यात आली आहे. या प्रकरणी कऱयाप्पा यल्लट्टी या तरुणाविरुध्द एफआयआर दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हारुगेरी पोलीस स्थानकात भा.दं.वि. 363, 342, 376(2), 506, 323, 324, 109 सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला असून पिडीत बालिकेची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. हारुगेरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.