|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » विविधा » पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसद सभागृहात सन्मान

पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांचा ब्रिटनच्या संसद सभागृहात सन्मान 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मदर तेरेसा पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार आणि चार वेळस फिल्मफेअर पुरस्कार विजेत्या पद्मश्री डॉ.अनुराधा पौडवाल यांना नुकतंच ब्रिटनच्या संसद सभागृहात इंडो ब्रिटिश ऑल पार्टी पार्लिमेंटच्या वतीने त्यांच्या संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल गौरविण्यात आले आहे. सदर सोहोळ्यास ब्रिटिश ऑल पार्टीचे संसद सदस्य, राजकारणी, एशियन रेडिओ, टीव्ही आणि प्रिंट मीडिया, तसेच यूकेमधील भारतीय संगीत क्षेत्रातील अग्रगण्य प्रतिनिधी उपस्थित होते. 

अनुराधाजींनी आजवर ४५ वर्षे अनेक भारतीय भाषांमधील 1500 हून अधिक गाणी गाऊन भारतीय संगीतसृष्टीत मानाचा तुरा रोवला आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील अजरामर कारकीर्द निभावणाऱ्या अनुराधाजी आपल्या सुरमधूर स्वरांनी श्रोत्यांची मनं जिंकण्याबरोबरचं इंडो ब्रिटिश ऑल पार्टी पार्लिमेंटच्या वतीने मिळालेल्या पुरस्काराबद्दल सांगताना म्हणतात की, “८०० वर्षांचा इतिहास लाभलेल्या ब्रिटिश संसदेत पुरस्कार प्राप्त होणे ही माझ्यासाठी खूपच आनंददायी बाब असून आजवरच्या श्रोत्यांच्या वाढत्या प्रेमामुळेच हे सर्वकाही शक्य होऊ शकले आहे. आपण केलेले कार्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असून त्याची इतक्या मोठ्याप्रमाणावर दखल घेतली जात असल्याची जणीव हा पुरस्कार स्वीकारताना होत आहे.”

सध्या, त्यांच्या जागतिक दौऱ्यांदरम्यान यूके आणि ऑस्ट्रेलियाला जाऊन आल्या असून पुढे श्रीलंका आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा प्रवास करणार आहेत व त्याचबरोबर एक प्रमुख भक्ती प्रकल्पावर काम देखील सुरु आहे.

Related posts: