|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

थोडा तरी देवधर्म करा, संकटातून तारले जाल

बुध. दि. 11 ते 17 जुलै 2018

पूर्वीच्या काळी रस्त्यावर एखादे भटजी, गुरुजन ब्राह्मण अथवा थोर मंडळी दिसली की लोक त्यांना पदस्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेत असत. थोरामोठय़ांचा आदर व त्यांचा  आशीर्वाद तसेच त्यांना देवस्थानी पहाणे अशी भावना त्याकाळी होती. लहानथोर सर्वजण सायंकाळी दिवे लागणीला शुभं करोती मंत्र म्हणत, कारण ती दिव्याची पूजा असल्याने अनिष्ट शक्तीचा शिरकाव घरात होऊ नये हा त्या मागील हेतू होता. थोरामोठय़ांचा आशीर्वाद पाठीशी असल्याने कोणतीही संकटे आली तरी त्यातून सुटका होत  असे. पण आजकाल तसे कुठेही दिसत नाही. हल्लीच्या तरुणाईला देवधर्म नकोसा झालेला आहे. देवाचे काही करा म्हटले की त्यांना अंगावर विंचू पडल्यासारखा वाटतो. गुरुजन, भटजी व ब्राह्मण तर सोडाच  स्वत:च्या  आईवडिलांच्या पाया पडणे, त्यांना नमस्कार करणे म्हणजे त्यांना मागासलेपणा वाटतो. शांती, कर्म अथवा पूजा झाल्यानंतर भटजींना नमस्कार करा म्हटल्यावर यांच्या कपाळावर हजारो आठय़ा पडतात. अगदी नाईलाज म्हणून हे लोक नमस्कार करतात. असे वागणे चांगले नाही. मनुष्यप्राण्यावर कोणते संकट केव्हा येईल ते सांगता येत नाही. पण तुमच्या मागे जर थोरामोठय़ांचा तसेच दैवी आशीर्वाद असेल तर कोणत्याही  संकटातून सुटका होते. पण हल्ली मुलामुलींना देवाधर्माचे वावडे असल्याने ते देवादिकांचे काहीही  करीत नाहीत. वास्तविक असे होऊ नये. रोज आपल्या हातून थोडातरी देवधर्म, जपजाप्य, नामस्मरण, स्तोत्रपठण होणे आवश्यक आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनात बाहेर गेलेला माणूस घरी परत येईल याची खात्री नसते. त्यासाठीच तर भूमीवंदन, मातापित्यांचे चरणस्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेणे व आपल्याला आवडणाऱया कोणत्याही देवाची आराधना करणे ही खरी गरज आहे.हल्लीच्या तरुण मुलामुलींना याबाबत विचारले असता पाया पडून नमस्कार करण्यायोग्य व्यक्ती आहेत तरी कुठे असे म्हणतात. ज्याला आदर्श मानावा, गुरुस्थानी मानावे अशा व्यक्ती आज नाहीत. आज सर्वत्र बुवा, महाराज तथाकथित  साधू संत महंत, आचार्य तसेच स्वत:ला परमपूज्य आई म्हणून देवी समजणाऱयांचे प्रस्थ वाढलेले आहे. ज्यांना गुरुस्थानी मानले त्याच क्यक्ती आत्महत्या, बलात्कार, गुंडगिरी, आर्थिक शोषण, राजकीय स्टंटबाजी तसेच नको ती नाटके करीत असल्याने अशा लोकांना पाया पडून आपले पुण्य कमी का करावे, असा विचार देखील वाढत आहे व त्यात चुकीचे काही असेल असे वाटत नाही. आपले चांगले वाईट कर्म हेच आपले दैव समजल्यास जीवनात कोणत्याही अडचणी उद्भवणार नाहीत, असे काहीजण म्हणतात. एक माणूस गंभीर आजाराने त्रस्त होता तो बरा झाल्यास पाच  बकऱयांचा बळी देईन, असा नवस एकाने केला त्यावर दुसऱयाने उत्तर दिले या जगात जर देव  असेल तर त्याने माझ्यासमोरचा दगड हालवून तो दूर करून दाखवावा, जर ही साधी गोष्ट तो करीत नसेल तर त्याच्या नावाने बळी का द्यायचा? जो बळी देणार तो  आपण स्वत:च खाणार असे देवाने जाहीर केल्यास कुणीही देवाच्या नावाने बळी  देणार नाहीत हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. या साऱया गोष्टी मान्य केल्या तरी स्वच्छ मनाने देवाधर्माचे थोडे तरी हल्लीच्या मुला मुलींनी केले पाहिजे, ते त्यांना योग्य संस्कार घडवील व पुढे जीवनात त्याचा निश्चित फायदा होईल. पत्रिकेत गुरु शुभ असेल तरच ती व्यक्ती धार्मिक होते.

 

मेष

उद्याची अमावास्या पराक्रमस्थानी होत आहे. मानसिक चंचलता अनारोग्य व ताणतणाव दूर करण्यास मदत करील. या यांत्रिक उपकरणे विजेच्या वस्तू सावधानतेने हाताळून कोणतेही काम करा. मोठी गुंतवणूक करताना त्यातील आकर्षक जाहिरातीला भुलू नका. महत्त्वाची खरेदी, वाटाघाटी, प्रवास व बोलणी करताना चारचौघा जाणकारांना बरोबर घ्या. म्हणजे फसवणूक होणार नाही.


वृषभ

उद्याची अमावास्या धनस्थानी होत आहे. कोणतेही आर्थिक निर्णय विचार करूनच घ्या. आर्थिक बाबतीत पंचमातील मंगळ चांगले फळ देईल. अनेक बाबतीत लाभदायक व मोठे यश देणारी कामे मिळतील. नवे स्नेहसंबंध, मित्र मैत्रिणींचे सहकार्य तसेच सर्व कामात मनाजोगते यश मिळवाल. धनलाभाच्या दृष्टीने ही अमावास्या विशेष चांगली नाही. त्यामुळे जरा सावधानतेने वागा.


मिथुन

उद्याची अमावास्या तुमच्या राशीत होत आहे. आर्द्रा व पुनर्वसु नक्षत्र असलेल्यांनी जरा काळजी घ्यावी. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने चांगले योग. बराच काळ रखडलेले अनेक प्रश्न सुटतील. घराण्यातील अनेक गुप्त गोष्टीचा छडा लागेल. वास्तुदोष, नोकरी, व्यवसायात काही गोष्टी मनात नसतानाही कराव्या लागतील. वास्तुविषयक पावित्र्य व मांगल्य राखा. वडिलधारी माणसांची मने न दुखवता कामे करून घ्या.


कर्क

उद्याची अमावास्या धार्मिक व आध्यात्मिक कार्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. कोणतेही शुभ व दैवी कार्य करणार असाल तर त्यात यश मिळेल. देवधर्म व्यवस्थित असेल तर साक्षात्कार होईल. तुमच्या जीवनाला सुखी करणारा एखादा मित्र अथवा मैत्रीण भेटेल. मानसिक समाधान मिळेल. एखादी किमती वस्तू हरवली असेल तर त्याचा पत्ता लागेल. सरकारी कामात अडथळे येत असतील तर ती कामे पुढे ढकला.


सिंह

उद्याची दर्श अमावास्या लाभयोगात होत आहे. आरोग्याच्या तक्रारी व शत्रूभय असेल तर ते दूर होईल, पण आरोग्याची काळजी घ्यावी. थटामस्करी करताना कुणाशी शत्रुत्व निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. किरकोळ कारणावरून चांगले असलेले संबंध बिघडवू देऊ नका. नक्षत्र स्वामीच्या पूजनाने अनेक समस्या सुटतील.


कन्या

दशमात होणारी उद्याची दर्श अमावास्या वैवाहिक व सामाजिक तसेच नोकरी व्यवसायाशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी घडवील. नोकरवर्गाशी मतभेदाची शक्मयता आहे. काही गैरसमज, शत्रुत्व यामुळे होणारी छळवणूक, भागीदारी व्यवसायात तसेच प्रवासात येणाऱया अडचणी असतील तर त्यातून काही तरी मार्ग मिळेल. अचानक पाहुणे आल्याने तारांबळ व कामात अडचणी जाणवतील.


तुळ

गुरुवारची दर्शअमावास्या भाग्यात आलेली आहे. मानसिक संभ्रम असेल तर तो दूर होईल. कुणाचे ऐकून करणीबाधेच्या प्रकारामागे लागू नका. आर्थिक व मानसिक समाधान हरवून बसाल. गुप्त शत्रू तुमचा उत्कर्ष सहन न होणारे अशा लोकांपासून चार हात दूर राहणे चांगले. वाहन अपघात व सर्व तऱहेच्या बाधा यापासून जपा. घरदार व उद्योग व्यवसाय याकडे विशेष लक्ष द्या.


वृश्चिक

शनिची साडेसाती व त्यातच मृत्युस्थानी आलेली उद्याची अमावास्या म्हणजे शापीत योगच समजावा. पूर्वजांचे दोष जागृत होणे, वास्तूदोष, किरकोळ आजारासाठी चुकीचे निदान व त्यासाठी मोठे खर्च उद्भवतील. विजेच्या धोक्मयापासून दूर रहा. विवाहात अडथळे येत असतील तर तूर्तास प्रयत्न करू नका. कुलदेवतेची आराधना करा. घराण्यातील अनेक दोष नष्ट होतील.


धनु

सप्तमात होत असलेली उद्याची दर्श अमावास्या चांगली नाही. ‘मनी वसें ते स्वप्नी दिसे’ या म्हणीचा तात्पर्य येईल. वाईट स्वप्ने पडणे, पूर्वीच्या काही भयानक प्रकरणातून शत्रुपीडा, आरोग्यात बिघाड, आजूबाजूच्या लोकांचा त्रास होणे असे प्रकार घडतील. धार्मिक आराधनेने रहाती वस्तू शांत ठेवा. कोणतीही संकटे आली तरी त्यातून परस्पर मार्ग निघेल.


मकर

 कुणाला मदत करायला जावे व नको ते प्रकरण होऊन त्यात अडकावे असे प्रकार घेऊन ही दर्शअमावास्या आलेली आहे. पण बिघडलेल्या संबंधाना नवा उजाळा देणारी तसेच ऐश्वर्य व धनलाभ यांचा संगम असल्याने सर्व बाबतीत शुभ आहे. मोठी गुंतवणूक केलेली असेल तर ती काढून घेण्याचा प्रयत्न करा. पुढे त्याचा फायदा होईल.


कुंभ

 संशयीवृत्तीमुळे चांगली माणसे दुरावतात तर कुणाला साधी मदत केली तर तीच माणसे ऐनवेळी कुठेतरी उपयोगी पडतात. या सप्ताहात तसा अनुभव येईल. व्यसन असेल तर ते सोडण्याचा प्रयत्न करा. दर्श अमावास्या पंचमात आहे. मुलाबाळांच्या बाबतीत त्रासदायक ठरेल. ‘घरचे झाले थोडे, त्यातच व्याहय़ाने धाडले घोडे’ असा प्रकार घडेल, पण अडलेल्या  कामांना गती मिळेल. तशीच जबाबदारी वाढेल.


मीन

चतुर्थात होत असलेली उद्याची दर्श अमावास्या काही बाबतीत नवे अनुभव देण्याची शक्मयता आहे. घराण्यात जर सावकारी दोष असतील तर त्यामुळे काही शापीत दोष निर्माण होतात. त्यामुळे ऐनवेळी अडचणी येतात, मानसिक समाधान लाभत नाही. किरकोळ बाबी प्रति÷sचे करू नका. जर तुमची बाजू बरोबर असेल तर गेलेली नोकरी परत मिळेल. आर्थिक अडचण भेडसावत असतील तर त्या कमी होऊ लागतील.

Related posts: