|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » स्पेन फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी एन्रीक

स्पेन फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी एन्रीक 

वृत्तसंस्था/ बार्सिलोना

बार्सिलोना फुटबॉल क्लबचे व्यवस्थापक लुईस एन्रीक यांची स्पेनच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्पेन फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष रूबलियास यांनी ही घोषणा केली.

एन्रीक हे रियल माद्रीद, बार्सिलोना, स्पोर्टींग गिजॉन क्लबकडून खेळत असत. त्यांनी आपल्या कारकीर्दीत व्यवस्थापक या नात्याने 2014 आणि 2017 या कालावधीत बार्सिलोनाला प्रशिक्षक म्हणून यशस्वी कामगिरी करताना एकदा चॅम्पियन्स लीग तसेच तीनवेळा किंग्ज चषक स्पर्धा आणि दोनवेळा ला लीगा फुटबॉल स्पर्धा जिंकून दिल्या आहेत. 2010 साली स्पेनने फिफाच्या विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते पण 2018 च्या रशियातील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेनला यजमान रशियाकडून दुसऱया फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे स्पेनचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले