|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ ‘श्राद्ध’ आंदोलन

खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ ‘श्राद्ध’ आंदोलन 

बांधकाम व नगरपालिकेचा नागरिकांकडून निषेध : खड्डेमय रस्त्यांवर अनेक अपघात, शाळकरी मुलेही जखमी

प्रतिनिधी / मालवण:

मालवण-कसाल मार्गावरील देऊळवाडा येथे खड्डय़ांचे मोठे साम्राज्य निर्माण झाले असून या खड्डय़ांमुळे त्रस्त नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने व याबाबत लक्ष न देणाऱया मालवण नगरपरिषदेच्या नावाने बुधवारी रस्त्यावरच श्राद्ध घातले. दरवषी तात्पुरती मलमपट्टी करणाऱया सार्वजनिक बांधकाम विभागाने यावषी खड्डय़ांबाबत कोणतीही उपाययोजना केलेली नाही तसेच नगरपालिकेलाही या समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नाही, अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली.

 देऊळवाडा येथील रस्त्यावर पावसामुळे मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. देऊळवाडा येथून आडारीकडे वळणाऱया या नाक्मयावर दरवषी पावसाळय़ात खड्डय़ांचे साम्राज्य दिसते. यावषीही या रस्त्यावरील खड्डय़ांनी डोके वर काढले असून या खड्डय़ांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करीत प्रवास करावा लागत आहे. खड्डय़ांमुळे वाहनचालक व शाळकरी मुलांचे येथे वारंवार अपघात होत आहेत. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे या खड्डय़ात आदळून काही दुचाकीस्वार पडल्याच्या घटना घडल्या आहेत. नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेच्या कामामुळे चेंबरच्या ठिकाणी हा रस्ता मोठय़ा प्रमाणात खचलाही आहे. या खड्डय़ांतील चिखल वाहनांमुळे थेट रस्त्यालगतच्या घरात उडत असल्याने या भागातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्यात येऊनही अद्याप याची दखल घेण्यात आलेली नाही. खड्डय़ांमध्ये माती व दगड टाकल्याचे दिसत आहे.

खड्डय़ांमुळे या ठिकाणी गंभीर अपघात होण्याची शक्मयता असल्यामुळे सुस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी बुधवारी सकाळी देऊळवाडा येथील नागरिकांतर्फे  मालवण देऊळवाडा येथे खड्डेमय रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा व नगरपरिषदेचा निषेध करीत अनोखे श्राद्ध आंदोलन छेडण्यात आले. यावेळी श्रेयस माणगावकर, बाळा माणगावकर, गणेश डिचवलकर, शरद मालवणकर, निखील पारकर आदी नागरिक उपस्थित होते.

हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असून दरवषी येथे खड्डय़ांचे साम्राज्य असतानाही बांधकाम विभाग उपाययोजना करीत नाही. केवळ दगड माती टाकून मलमपट्टी केली जाते. भुयारी गटार योजनेच्या कामामुळे या रस्त्याची पुरती दुर्दशा झाली असताना नगरपालिकेलाही रस्त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. याबाबत नगरसेवक व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगत नागरिकांनी संताप व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेने तातडीने हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली.

स्वाभिमान पक्षाची स्टंटबाजी उघड

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने खड्डे बुजविण्यात न आल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर बांधकाम विभागाने काही ठिकाणी मलमपट्टी केली होती. दुरुस्तीनंतर स्वाभिमानने सोशल मीडियावर तात्काळ आंदोलनाचा इशारा अन् दुरुस्ती अशा पोस्ट टाकून आपली पाट थोपटून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, देऊळवाडा रस्त्यावर दुरुस्ती न केल्याने स्वाभिमानचा आंदोलनाचा इशारा हा फक्त स्टंटबाजी होती काय? अशी चर्चा शहरात सुरू आहे.

Related posts: