|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » व्हाया सावरगाव खुर्द’, ‘चारीमेरा’ नवे आयाम देणाऱया कलाकृती

व्हाया सावरगाव खुर्द’, ‘चारीमेरा’ नवे आयाम देणाऱया कलाकृती 

प्रतिनिधी/ मडगाव

दिनकर दाभाडे आणि सदानंद देशमूख यांच्या 2016 रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘व्हाया सावरगाव खुर्द’ आणि ‘चारीमेरा’ या दोन कादंबऱया त्यांच्या विभिन्न दृष्टीकोनांमुळे मराठी कादंबरीला नवे आयाम देणाऱया कलाकृती आहेत. दोघेही कृषी संस्कृतीत रुळलेले विदर्भीय कादंबरीकार आहेत. दाभाडे हे पूणवेळ शेतकरी आंदोलनाचे खंदे कार्यकर्ते आहेत. लेखक शरद जोशींचा त्यांच्यावर प्रभाव आहे. दुखमुखांसारखे थोर सांस्कीतक अनुबंध खुणावणारे तर दाभाडे शेतीच्या अर्थकरणाला प्राधान्य देणारे लेखक आहेत, असे मत प्रसिद्ध लेखक आणि समीक्षक विश्राम गुप्ते यांनी मडगाव येथे व्यक्त केले.

गोमंत विद्यानिकेतनच्या मासिक आस्वाद कार्यक्रमात ते बोलत होते. गोमंत विद्यानिकेतनचे अध्यक्ष जनार्दन वेर्लेकर यांनी प्रास्ताविक केले. साधना साप्ताहिकात गुप्ते यांचे लेख दोन भागात प्रसिद्ध झाले होते. या लेखातील विचार प्रभाली वाटल्याने आपण गुप्ते यांना ‘आस्वाद’मध्ये आमंत्रित केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनाचा लाभ गोव्यातील साहित्यक्षेत्राला उर्जा देण्यास उपयुक्त ठरेल, असे यावेळी वेर्लेकर म्हणाले.

पुढे बोलताना गुप्ते म्हणाले की, जगात नैतिक-अनैतिक काहीच नसतं असे म्हणणाऱयांनी दाभाडेंची अर्पणपत्रिका तर माणसाला किंवा साहित्याला आपापल्या भूमीवरच आपल्याला भाषिक समूहातच डौलाने उभे राहता येते – इति नेमाडे यांची देशवादी भूमिका. या दोन भिन्न दृष्टीकोनामुळेच या दोन सकस कादंबऱयांची तुलना, त्यातील साम्यभेद आणि अंतर्विरोध आव्हानात्मक वाटते. या कादंबरीकारांचे मराठी कादंबरीला मोलाचे योगदान लाभले आहे. ज्यांनी हिंदू ही नेमाडेंची कादंबरी वाचली आहे, त्यांना दाभाडेंची कादंबरी पचवणे जड जाईल एवढी ते सामान्य वाचकाला नैतिक हुडहुडी भरवणारी आहे. ही त्यांच्या कादंबरीने स्वीकारलेल्या मुल्यव्यवस्थेची तात्विक भूमिका आहे. भावरम्य ग्रामीण संस्कार, साधी भोळी नैतिकता आणि स्वायत्ततेच्या मुल्याला सर्वश्रेष्ट समजणाऱया नेमाडय़ांच्या ‘हिंदू’चा रोमँटिक ग्रामीण व्हीजनची ज्या वाचकांवर भूरळ आहे त्यांना दाभाडेंची कादंबरी जबरदस्त सांस्कृतिक धक्का देते. कारण सावरगावात पात्रांचा अनिर्बंध सत्ताकक्षेचा आणि लसलसीत लैंगीक प्रेरणांचा जो बिनधास्त खुल्लमखुल्ला आविष्कार आहे तो यापूर्वी कुठल्याही मराठी कादंबरीत इतक्या थेटपणे आलेला नाही, असे ते म्हणाले.

प्रथम पुरुषी आत्मनिवेदनातून एकेकाळी निरागस वाटणाऱया स्वायत्त ग्रामीण संस्कृतीचा सत्तेच्या हव्यासापोटी आणि लैंगीक वासनापूर्तीसाठी जे नैतिक अधःपतन झाले आहे ते व्यक्त होते. ते वाचताना आपण हादरतो आणि या माणसांना आपण चुकतो आहोत, नैतिकदृष्टय़ा पाप करतो आहोत असा पश्चातापाचा लवलेश त्यांच्या मनात नाही, ही बाब अधिक धक्कादायक ठरते. मराठी वाङमयात ही पश्चातापदग्ध संवेदनशीलता साने गुरुजींपासून तसेच जागतिक साहित्या डिएन्स, डोस्टोव्हस्की, टॉलस्टॉय, व्हिक्टर हय़ुगोसारख्या अभिजात कादंबरीकारांनी स्वीकारलेली आहे. म्हणूनच ही कादंबरी जागतिकीकरणापूर्वीची नसून ती 1991 नंतरची पोस्ट मॉर्डन कादंबरी ठरते. देशीवादी कादंबरीला दाभाडेंनी दिलेले आव्हानात्मक आव्हानवजा प्रत्युत्तर ठरते या भूमिकेतून, असे जोशी म्हणाले.

देशमुखांची चारीमेरा सर्वोत्तम देशीवादी कादंबरीचा नमुना म्हणून आपणसमोर आहे आणि या कादंबरीचा नायक उदेभान हा त्या कादंबरीचा प्रोटेगनिस्ट आहे. तो अंतर्मुख आणि उदासवाणा आहे. शेतकऱयांची दुरावस्था दोन्ही कादंबरीकारांना भिडते, मात्र वेगळय़ा धारणांतून चारीमेरा या शब्दातील मेर म्हणजे शेतीचा बांध. चारीमेरा म्हणजे शेतीच्या चारी बाजू. त्या सुरक्षित असतील तर शेती फळते. त्या मोडकळीस आल्या तर शेती नष्ट होईल. ती नष्ट झाली तर कृषीसंस्कृती नष्ट होईल. शेतीची राखणदारी ही उदेभानला आपली सांस्कृतिक जबाबदारी वाटते. त्यासाठी शेतकऱयाची भूमिनिष्ठा-नैतिकता महत्त्वाची असे तो मानतो. चारीमेरा वाचताना नेमाडे यांच्ये ‘चांगदेवचे तुष्टय़’ आठवल्याशिवाय राहत नाही. चांगदेव पाटील आणि उदेभान चिकणे दोघेही स्वअस्तित्त्वाच्या खिन्न प्रकाशात न्हावून निघतात. त्यांची व्याकूळ मेलडी पानीपानी ऐकू येते. स्वतःच्या शेतीची दुर्दशा पाहून दुःखी होणारा उदेभान कुठल्याही सामान्य कास्तकारासारख आहे. तो एक उपवादात्मक असा हळवा कवी आहे. त्यामुळे अस्सल ग्रामीण बाज असशलेल्या या वऱहाडी कादंबरीला अभिजात असे अस्तित्ववादी परिमाण लाभले आहे, असे ते म्हणाले.

शेतमालाला योग्य भाव मिळवा ही शेतकऱयाची माफक अपेक्षा स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात फलद्रुप झालेली नाही याची खंत दोन्ही कादंबरीकारांना आहे, मात्र दाभाडे भौतिक, आर्थिक, व्यावहारिक दृष्टीकोनातून या पडझडीकडे निर्भयपणे पाहतात, तर देशमुख औद्योगिक स्मरणरंजन परंपारा आणि सांस्कृतिक मुल्यांतून या वाताहतीने शोकाकूल होतात. जागतिकीकरणामुळे शहरी आणि ग्रामीण भेद आता लयाला जात आहेत. हातात मोबाईल हवा, मात्र रात्री मोबईल टॉवर पाहून उदेभानच्या बायकोला तो आक्राविक्राळ राक्षसासारखा भासतो. वाचक म्हणून आपण आस्थेने या दोन कादंबऱयांचे आव्हान पेलायला हवे, असेही ते शेवटी आपल्या व्याख्यानात म्हणाले.

Related posts: