|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » leadingnews » आता सर्वांसाठी समान इंटरनेट ; नेट न्यूट्रलिटीला केंद्राची मंजूरी

आता सर्वांसाठी समान इंटरनेट ; नेट न्यूट्रलिटीला केंद्राची मंजूरी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

केंद्र सरकारने देशामध्ये ‘नेट न्यूट्रलिटी’च्या तत्त्वाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारतामध्ये इंटरनेट कुठल्याही बंधनाविना आणि एकसमान राहणार आहे. ‘नेट न्यूट्रलिटी’ तत्त्वाचा भंग करणाऱयांविरुद्ध मोठा दंड आणि कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. नॅशनल डिजिटल कम्युनिकेशन पॉलिसी (एनडीसीपी)2018 अशी ही नवी टेलिकॉम पॉलिसी असून कॅबिनेटकडे आता ते मंजुरीसाठी गेले आहे.

कुठल्याही एका विशिष्ट साइटला प्राधान्याने सेवा पुरवू नये किंवा इंटरनेटचा वेग विशिष्ट सेवांसाठी अधिक ठेवू नये, किंवा इंटरनेटवरील काही सेवा किंवा साइट्स या मोफत मिळतील अशी ‘झीरो रेटेड’ योजना राबवू नये, अशी तंबी मोबाइल ऑपरेटर्स, इंटरनेटची सेवा पुरवणारे आणि सोशल मीडिया कंपन्यांना देण्यात आली आहे. मात्र, ऑटोनोमस ड्रायव्हिंग किंवा टेलिमेडिसीनसारख्या सेवांना की जिथे सामान्य वेगापेक्षा अधिक वेगाने इंटरनेट लागते अशा सेवांना या नियमातून अपवाद केले आहे.

 

Related posts: