|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » Top News » मुलीने पोलिसांना फोन केला अन् बाप गेला तुरूंगात

मुलीने पोलिसांना फोन केला अन् बाप गेला तुरूंगात 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. दारूडय़ा बापाने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा वारंवार शारीरिक छळ केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे जराही न घाबरता मोठय़ा धैर्याने मुलीने दारूडय़ा बापाविरोधात तक्रार करण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईनची मदत घेतली आहे.

याप्रकरणी, विशेष न्यायालयाने बुधवारी 35 वषीय आरोपीला 10 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 2014 मध्ये, एका 11 वर्षांच्या मुलीने घरामध्ये छळ होत असल्याची तक्रार चाईल्ड हेल्पलाईनवर केली होती. यावेळी दारूडय़ा वडिलांचे असलेले विवाहबाह्य संबंध, दारूच्या नशेत प्रत्येक रात्री तिला आणि तिच्या भावाला होणारी अमानुष मारहाण, घरात आई नसल्याने दररोज भोगाव्या लागणाऱया यातना तिने चाईल्ड हेल्पलाईनवर सांगितल्या. यानंतर हेल्पलाईनच्या एक महिला सामाजिक कार्यकर्त्या पीडित मुलीच्या घरी पोहोचल्या व तिच्यासोबत संवाद साधला. यावेळी घडल्या प्रकाराबाबत वडिलांसोबत बोलणी करणार असल्याचे आश्वासन देऊन त्या तेथून निघाल्या. दुसऱया दिवशी पुन्हा मुलीने चाईल्ड हेल्पलाईनकडे संपर्क साधत भावासहित तिला मारहाण झाल्याची तक्रार केली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपी बापाला याबाबत विचारणा केली असता, त्याने मुलांना मारहाण केल्याचे नाकारले. शिवाय, मुलांचा योग्यरित्या सांभाळ करेन, असे आश्वासनही लिखित स्वरुपात दिले. यानंतर सामाजिक कार्यकर्त्या प्रत्येक महिन्यात या मुलीची घरी जाऊन भेट घ्यायच्या. त्यावेळेस आरोपी केवळ सामाजिक कार्यकर्त्यांसमोर चांगले वागण्याचे नाटक करायचा आणि त्यांची पाठ वळताच मुलीचा छळ होणे सुरू व्हायचे. अचानक एका दिवशी पीडित मुलीच्या घरी धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला. पित्यानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करायला सुरूवात केली. ती किंचाळत होती, विव्हळत होती. पण आरोपी बापाला तिची थोडीशी दया आली नाही. तिचा आवाज शेजाऱयांपर्यंत पोहोचू नये, यासाठी त्याने तिचे तोंड हाताने दाबले. घडल्या प्रकारामुळे पीडितेला मोठा धक्का बसला. ती अस्वस्थ झाली. आपल्या जन्मदात्या वडिलांकडूनच अत्याचार झाल्याचे तिने शेजाऱयांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला पोलीस स्टेशनमध्ये वडिलांविरोधात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर नराधम बापाने लैंगिक अत्याचाराचा आरोप फेटाळून लावला. शिवाय, माझ्या मुलीला सामाजिक कार्यकर्त्यांनी माझ्यावर भलते-सलते आरोप लावण्यास भाग पाडल्याचा उलट आरोप केला. तसेच विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेच्या मुलांवर खर्च करतो म्हणून माझ्या मुलीचा जळफळाट होतो, असा खोटा दावा त्याने न्यायालयासमोर केला. मात्र न्यायालयाने त्याचा दावा फेटाळून लावला. साक्षीदारांच्या साक्ष नोंदवत व पीडितेच्या जबाबावरुन आरोपी बापाच्या मुसक्मया आवळत न्यायलायने त्याला 10 वर्षांची शिक्षा ठोठावली आहें.

Related posts: