|Saturday, February 16, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेस सत्तेत आल्यास बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करू -पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेस सत्तेत आल्यास बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करू -पृथ्वीराज चव्हाण 

ऑनलाईन टीम / नागपूर :

पंतप्रधान नरेंद्र मोदोंचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या बुलेट टेन प्रकल्पाला होणारा विरोध पाहून काँग्रेसने एक मोठी घोषणा केली आहे. आमची सत्ता आली, तर मुंबई-अहमदाबाद बुलेट टेन प्रकल्प रद्द करू, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल आहे.

बुलेट टेन प्रकल्पाच्या उभारणीसाठी येणाऱया खर्चात केंद्रासोबत महाराष्ट्राचाही वाटा आहे. त्यासाठी 250 कोटीच्या निधीची अतिरिक्त तरतूद करण्याचा प्रस्ताव मंगळवारी विधानसभेत मांडण्यात आला होता. त्यावरून विरोधक आक्रमक झाले होते. त्यांनी प्रस्तावाला तीव्र विरोध केला होता. त्यानंतर, पृथ्वीराज चव्हाण यांनी बुलेट टेनबाबतची काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. हा प्रकल्प व्यवहार्य नाही आणि आर्थिकदृष्टय़ाही परवडणारा नाही, असे त्यांनी नमूद केले आहे. इतकेच नव्हे तर, काँग्रेस सत्तेत आल्यास बुलेट टेन धावणार नाही, असेही त्यांनी जाहीर करून टाकले. दरम्यान, बुलेट टेन प्रकल्पासाठी होत असलेल्या भूसंपादनाला नागरिकांकडून विरोध होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकल्पाविरोधात बिगुल वाजवला आहे, पण भाजपासोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेलाही हा प्रकल्प मान्य नाही. महाराष्ट्रात इतर पायाभूत सुविधांचा अभाव असताना, रेल्वे सेवा पार खिळखिळी झाली असताना, ती सक्षम करण्याऐवजी 1 लाख कोटी रूपये बुलेट टेनसाठी देण्याच्या भूमिकेवर जनतेतही नाराजी आहे. त्याचा फायदा घेण्याची खेळी काँग्रेस खेळू शकतो.

Related posts: