|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » फेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपचे नवे फिचर

फेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपचे नवे फिचर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सोशल मीडियावरून फुटणारे अफवांचे पीक आणि त्यामुळे घडणाऱ्या दुर्घटना याची मोठी किंमत गेल्या काही काळात महाराष्ट्राने चुकवली. देशभरातही समाजकंटकांकडून सोशल मीडियाचा वापर शस्त्रासारखा केला जातोय. जगभरातही हे प्रमाण खूप मोठे आहे. पण, आता अशा प्रकारांना मोठ्या प्रामाणावर आळा बसणार आहे. सोशल मीडियातील महत्त्वाचा घटक असलेले मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅपने एक नवे फिचर सुरू केले आहे. या फिचरमुळे व्हाट्सअॅपवर येणारा मेसेज कुणी तयार केला आहे याचा पत्ता लागणार आहे. याचाच अर्थ तुम्ही फॉरवर्ड करत असलेला मेसेज हा तुमचा स्वत:चा आहे की, तो दुसऱ्याच कोणी तयार केला आहे, हे या फिचरमुळे कळण्यास मदत होणार आहे. ‘फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर’, असे या फिचरचे नाव आहे.

या फिचर्सची माहिती देण्यासाठी कंपनीने जगभरात अनेक पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. या पत्रकार परिषदेत सांगण्यात येत आहे की, यूजर्सला आलेल्या एकूण मेसेजपैकी किती मेसेज हे संबंधीत व्यक्तीने तयार केलेले नसून, ते कॉपी पेस्ट (फॉरवर्ड) आहेत हे समजू शकणार आहे. तसेच एखाद्या व्यक्तीने तो मेसेज स्वत: तयार केला असेल तरीही त्याची माहिती समोरच्या व्हाट्सअॅप यूजर्सला मिळू शकते.

Related posts: