|Saturday, August 18, 2018
You are here: Home » Top News » चिडलेल्या नागरिकांनी थेट क्षेत्रीय कार्यालयातच फेकला कचरा

चिडलेल्या नागरिकांनी थेट क्षेत्रीय कार्यालयातच फेकला कचरा 

ऑनलाईन टीम / पुणे :

जनता वसाहत येथील स्वच्छतेच्या कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा निषेध म्हणून स्थानिक नागरिकांना बरोबर घेऊन महापालिकेच्या टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात आंदोलन केले. कार्यालच्या तिन्ही मजल्यांवर आंदोलकांनी कचरा फेकल्यामुळे कर्मचाऱयांना काम करणे अवघड झाले. त्यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार केल्यामुळे आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.

सूरज लोखंडे तसेच अन्य शिवसैनिकांनी सांगितले की टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात अनेकदा लेखी स्वरूपात तक्रार केली तरीही संपुर्ण जनता वसाहत परिसरात घाणीचे साम्राज्य जशाच तशे आहे. नाली, गटारे तुंबले असून, त्यातील घाण पाणी सातत्याने वहात असते. कचरा वेळेवर उचलला जात नाही. तो पडून राहिल्यामुळे कुजून दुर्गंधी सुटली आहे. अनेक तक्रारी आल्यानंतरही महापालिका प्रशासन त्याची दखल घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे चिडलेल्या नागरिकांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. शिवसेनेने त्याला पाठिंबा दिला. कार्यालय सुरू होताच तिथे 200 पेक्षा अधिक नागरिक तसेच शिवसैनिक जमा झाले. त्यांनी बरोबर कचरा आणला होता. प्रत्येक मजल्यावर जाऊन त्यांनी थेट दालनांमध्ये, लॉबीत कचरा फेकण्यास सुरूवात केली. त्यामुळे कर्मचाऱयांना तर काम करता येईनाच, शिवाय तिथे येणाऱया नागरिकांचीही अडचण झाली. महापालिकेच्या निषेधाच्या घोषणा देत तिथे आंदोलकांनी गोंधळ सुरू केला. त्यामुळे कर्मचारीही त्रस्त झाले. पीएमसी एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष बापू पवार यांनी त्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला. थोडय़ाच वेळात तिथे पोलिस आले. त्यांनी सूरज लोखंडे व अन्य शिवसैनिकांना अटक केली. त्या सर्वांना स्वारगेट पोलिस ठाण्यात नेण्यात आले. बापू पवार व कर्मचाऱयांनीही मोठय़ा संख्येने पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली.

Related posts: