|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » Top News » पेट्रोल पंप मालकास लुटणाऱया टोळीस अटक

पेट्रोल पंप मालकास लुटणाऱया टोळीस अटक 

ऑनलाईन टीम / पालघर :

4 जून रोजी पेट्रोल पंप बंद करून घरी जात असताना 5 ते 6 अज्ञात चोरटय़ांनी पंप मालकास मारहाण करून त्यांच्याजवळील 5 लाख 50 हजारांची रक्कम असलेली बॅग हिसकून घेतली. त्यानंतर अज्ञात चोरटे फरार झाले. याबाबत पंप मालक गोपाळ शर्मा यांनी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी खबऱयांमार्फत मिळालेल्या माहितीवरून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गोपाळ शर्मा हे पंप मालक 4 जूनला रात्री 10. 22 वाजण्याच्या सुमारास मोटार सायकलवरून घरी जात असताना 5 ते 6 अज्ञात इसमांनी समोरून मोटार सायकलवरून येऊन शर्मा यांना घेरले. मोटारसायकलवरून खाली पाडून लाथाबुक्मयांनी मारहाण केली आणि शर्मा त्यांच्याजवळील 5 लाख 50 हजार रूपयांनी भरलेली बॅग लंपास केली. त्यानंतर शर्मा यांनी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हे शाखेने कसून तपास केला. त्यानंतर खबऱयांनी दिलेल्या माहितीवरून काल रात्री 10.10 वाजता पालघर येथील वंकासपाडय़ातून रवींद्र पिंपळे आणि सचिन शिंदे या दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडून 2 लाख 34 हजार 410 रूपये आणि बजाज एक्ससीडी मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केली. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या या दोन आरोपींच्या चौकशीनंतर प्रदीप वढाण आणि संतोष चाकर या दोघांना पोलिसांनी अटक केली. हे सर्व आरोपी वंकासपाडय़ात राहणारे आहेत.

Related posts: