|Saturday, February 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चूक मनपाची, मनस्ताप हेस्कॉमला

चूक मनपाची, मनस्ताप हेस्कॉमला 

प्रतिनिधी /बेळगाव :

शहरात सध्या स्मार्टसिटीअंतर्गत शहरातील अनेक रस्त्यांचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. या कामादरम्यान भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी शिवबसवनगर येथे अशाप्रकारे वीजवाहिनी तोडण्यात आल्याने पुन्हा एकदा वीज पुरवठा ठप्प झाला होता. तो सुरळीत करण्यासाठी हेस्कॉमला विशेष मेहनत घ्यावी लागली. त्यामुळे चूक मनपाची आणि फटका हेस्कॉमला अशी परिस्थिती उद्भवली आहे.

बुधवारी शिवबसवनगर येथील 11 केव्ही क्षमतेची भूमिगत वीजवाहिनी तोडण्यात आली. जेसीबीने खोदकाम करताना वीज वाहिनीला धक्का लागला. यामुळे युजा rकेबल नादुरुस्त झाली. यामुळे परिसरातील काही भागात विद्युत पुरवठा ठप्प झाला. हेस्कॉमच्या कर्मचाऱयांनी मोठय़ा शर्थीने व पावसाचा सामना करत वीज पुरवठा पुन्हा सुरळीत केला.

24 वेळा तोडण्यात आलेली वीजवाहिनी

स्मार्टसिटी कंत्राटदारांकडून मागील दोन महिन्यात 24 वेळा वीजवाहिन्या तोडण्याचे प्रकार घडले आहेत. वारंवार ताकीद देऊनही कंत्राटदाराकडून हा निष्काळजीपणा सुरूच आहे. खोदकाम करण्यापूर्वी हेस्कॉमच्या अधिकाऱयांना माहिती द्या, असे सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. एखाद्या वेळेस खोदकाम करणाऱया जेसीबीला विजेचा धक्का बसल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.

ए. एम. शिंदे (साहाय्यक कार्यकारी अभियंता)

विकासकाम राबविताना अशाप्रकारे सिव्हिल हॉस्पिटल रोड व शिवबसवनगर येथे अशा वीजवाहिन्या तोडण्यात येत आहेत. याचा शहरातील विद्युत पुरवठय़ावर परिणाम होत असून वारंवार वीज पुरवठा ठप्प होत आहे. त्यामुळे कंत्राटदाराने खोदकाम करण्यापूर्वी हेस्कॉमला माहिती देणे गरजेचे आहे.      

Related posts: