|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गडहिंग्लजला घर कोसळल्याने लाखाचे नुकसान

गडहिंग्लजला घर कोसळल्याने लाखाचे नुकसान 

प्रतिनिधी /गडहिंग्लज :

गडहिंग्लज शहरासह परिसरात दुपारपासून पावसाने जोर धरला आहे. गुरूवारी दुपारी शहरातील बिलावर वसाहतीत घर कोसळून लाखाचे नुकसान झाले आहे. जोराच्या पावसामुळे हिरण्यकेशीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.

शहरातील बिलावर वसाहतीत रहाणाऱया काशव्वा शंकर बिलावर यांचे रहाते घर कोसळले आहे. यात घरासह संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.  काशव्वा या एकटय़ाच घरी रहात होत्या. काशव्वा या हसूरचंपू येथील नातेवाईकांकडे गेल्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. घर कोसळल्याने काशव्वा यांचा संसार उघडय़ावर आला असून त्यांची बालाजी युवक मंडळाने रहाण्याची सोय केली आहे. तर वसाहतीतील नागरिकांनी अन्य सोय केली आहे. दुपारनंतर गडहिंग्लज परिसरात जोराचा पाऊस असून नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास हिरण्यकेशीवरील ऐनापूर आणि निलजी बंधाऱयावर पुराचे पाणी येण्याची शक्यता तयार झाली आहे. पूर परिस्थितीची पहाणी महसूल अधिकाऱयांनी केली असून नदीकाठच्या गावातील कुटुंबांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

Related posts: