|Sunday, July 22, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारत जगात चौथ्या क्रमांकाची सैन्य शक्ती

भारत जगात चौथ्या क्रमांकाची सैन्य शक्ती 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

सैन्य सामर्थ्याप्रकरणी भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. शेजारी देश चीन आमच्यापुढे असून त्याने दुसरा क्रमांक मिळविला. परंतु पाकिस्तानच्या सैन्य सामर्थ्यात घट झाली आहे. मागील वर्षी तो 13 व्या स्थानावर होता, यंदा त्याला 17 वे स्थान मिळाले आहे. देशांच्या सैन्य सामर्थ्याचे दरवर्षी आकलन करणारी संस्था ग्लोबल फायर पॉवरच्या 2018 निर्देशांकात ही माहिती देण्यात आली आहे.

ग्लोबल फायर पॉवरने 2018 च्या निर्देशांकाचे आकलन करताना यात देशांची भौगोलिक स्थिती, साधनसामग्रीसह एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी नेण्याची क्षमता, नैसर्गिक संपदा आणि औद्योगिक समर्थनाच्या आधारावर मानांकन देण्यात आले. निर्देशांकात देशांचे आण्विक बळ आणि तेथील राजकीय नेतृत्व सामील करण्यात आले नाही.

Related posts: