|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » Top News » पेप्सीको इंडियाच्या उत्पन्नात 6 टक्क्यांची वाढ

पेप्सीको इंडियाच्या उत्पन्नात 6 टक्क्यांची वाढ 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

पेप्सीको इंडियाला सॉलिड मिड सिंगल डिजिट ऑर्गेनिक उत्पन्नात वाढ करण्यात यश मिळाले आहे. यांच्याकरिता कंपनीकडून मायक्रोइकॉनॉमिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थान मजबूत करण्यात आले आहे. याच कारणामुळे पेप्सीको इंडियाच्या उत्पन्नात 6 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.अशी माहिती कंपनीच्या मुख्य अधिकारी इंदीरा नुई यांनी दिली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात चांगले यश मिळाल्यानंतर काही ठिकाणी अभियान राबवण्यात आली यामुळे उत्पन्नात वाढ होण्यास मार्ग निर्माण झालेत. यांचा वापर इतर बाजारापेठामध्ये करण्यात आला. पेप्सीको इंडियाने व्यवसायात उत्पन्नाच्या आकडय़ाचा विचार न करता जीएसटीचा दबाव कमी होत गेल्याने उत्पन्नात या तिमाहीत चांगला फायदा कमवता येणार असल्याचा अंदाजही मांडण्यात येत आहे.

भारत आणि परदेशातील कंपन्याच्या सॉफ्ट ड्रिंक्स बाजारात घसरण दिसून आली. पण काही तज्ञांच्या मतानूसार मागील 12 आठवडय़ापासून चांगल्या उत्पन्नाचा अंदाज नोंदवण्यात आला आहे. पेप्सीकोचे अध्यक्ष अहमद शेख यांनी एका मुलाखतीत कंपनी उत्पन्न वाढवण्याकरिता काही ठराविक सकारात्मक बदल करण्यात येणार आहेत असे म्हटले आहे.

Related posts: