|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » क्रिडा » केर्बर, सेरेना अंतिम फेरीत

केर्बर, सेरेना अंतिम फेरीत 

वृत्तसंस्था /लंडन :

जर्मनीच्या अकराव्या मानांकित अँजेलिक केर्बरने लॅटव्हियाच्या एलेना ओस्टापेन्कोच्या चुकांचा लाभ घेत विम्बल्डन स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची तिची ही दुसरी वेळ आहे. त्याचप्रमाणे माजी विजेत्या सेरेना विल्यम्सनेही अंतिम फेरी गाठली आहे. तिने ज्युलिया जॉर्जेसचा पराभव केला. पुरुष एकेरीत राफेल नादाल, जॉन इस्नेर यांनी उपांत्य फेरी गाठली तर जुआन मार्टिन डेल पोट्रो व मिलोस रेऑनिक यांचे आव्हान संपुष्टात आले. अग्रमानांकित रॉजर फेडरर व जपानचा केई निशिकोरी यांना याआधीच स्पर्धेबाहेर पडावे लागले आहे.

ओस्टापेन्कोला आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न तिच्याच अंगलट आला आणि तिने अनेक अनियंत्रित चुका केल्याने 30 वषीय केर्बरला आपसुकच गुण मिळत गेले. केर्बरने हा सामना 6-3, 6-3 असा जिंकून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. पहिल्या साटमध्ये 3-3 अशी बरोबरी झाली तेव्हा दोघांतील चुरस रंगणार असेच वाटले होते. पण ओस्टापेन्कोने लांबवर फोरहँड फटका मारत सर्व्हिस गमविल्यानंतर सामना तिच्या हातातून निसटला. सेटपॉईंटवर तिने डबलफॉल्ट केल्याने केर्बरने हा सेट जिंकून आघाडी घेतली. दुसऱया सेटमध्ये ओस्टापेन्कोने काही शानदार फटके मारत काही गेम जिंकले. पण केर्बरने आपला खेळ उंचावला आणि हा सेटही जिंकून अंतिम फेरीतील स्थानही निश्चित केले.

दुसऱया उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या 25 व्या मानांकित सेरेना विल्यम्सने अंतिम फेरी गाठली असून तिने जर्मनीच्या 13 व्या मानांकित ज्युलिया जॉर्जेसचा 6-2, 6-4 असा पराभव केला. 2016 च्या विम्बल्डन अंतिम स्पर्धेतही केर्बर व सेरेना यांच्यात जेतेपदाची लढत झाली होती. सेरेनाने ही स्पर्धा सातवेळा जिंकली आहे.

Related posts: