|Sunday, September 22, 2019
You are here: Home » क्रिडा » लंकेच्या हेराथला निवृत्तीचे वेध

लंकेच्या हेराथला निवृत्तीचे वेध 

वृत्तसंस्था / कोलंबो :

लंकेचा फिरकी गोलंदाज रंगण्णा हेराथ येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱया इंग्लंड विरूद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर निवृत्त होत आहे. सदर वृत्त हेराथ स्वत: वृत्तसंस्थेशी बोलताना दिले.

रंगण्णा हेराथने लंकेकडून 90 कसोटी सामन्यात  418 बळी मिळविले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये विक्रमी 800 बळींचा टप्पा ओलांडणाऱया मुथय्या मुरलीधरन नंतर हेराथ हा लंकेचा सर्वाधिक बळी मिळणारा दुसरा फिरकी गोलंदाज आहे. लंकन संघात सध्या डी. परेरा, ए. धनंजय आणि सँडेकेन हे दर्जेदार फिरकी गोलंदाज असल्याचे हेराथने म्हटले आहे. निवृत्तीचा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे, असे हेराथला वाटते.