|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » तडीपार गुंडाचा साताऱयात खून

तडीपार गुंडाचा साताऱयात खून 

प्रतिनिधी /सातारा :

चार दिवसांपूर्वीच सातारा पोलिसांनी पकडलेला तडीपार असलेला गुंड कैलास नथु गायकवाड (वय 26 रा. नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा) याचा खून झाला. गुरुवारी मध्यरात्री फरशी व धारदार शस्त्राच्या साह्याने त्याच्या पोटावर, पाठीवर व डोक्यावर वार करून त्याचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. शाहूपुरी येथील अर्क शाळेजवळ निरामय हॉस्पिटलच्या संरक्षक भिंतीच्या आतील पत्राच्या शेडमध्ये गुंड कैलास गायकवाडचा मृतदेह आढळला असून, घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सदरचा खून त्याचा मित्र कैलास पिटेकर याने केला असावा, अशी वडिलांची तक्रार असून त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

  याबाबत प्राथमिक माहिती अशी, गुरुवारी सकाळी अर्कशाळेजवळ निरामय हॉस्पिटलच्या आतील बाजूस पत्राच्या शेडमध्ये एका युवकाचा मृतदेह पडला असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. परिसरात ही माहिती पसरल्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली. शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता तो मृतदेह कैलास नथु गायकवाड (वय 26, रा. नामदेववाडी झोपडपट्टी) याचा असल्याचे समोर आले. दरम्यान, त्याच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.

तडीपारीचे दोन वेळा उल्लंघन 

कैलास गायकवाड याला डिसेंबर महिन्यात तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीत असतानाही तो साताऱयात खुलेआम फिरत होता. आत्तापर्यंत दोनवेळा त्याने तडीपार आदेशाचे उल्लंघन केले असून चार दिवसापूर्वीच त्याला सातारा तालुका पोलिसांनी उरमोडी धरणाजवळ अटक केली होती. गुंड गायकवाड सातायात पुन्हा एकदा कसा आला, त्याचा खून कोणी केला याची सखोल चौकशी शाहूपुरी पोलीस करीत आहेत.

Related posts: