|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कला अकादमीत 15 रोजी ‘कालिदास महोत्सव’

कला अकादमीत 15 रोजी ‘कालिदास महोत्सव’ 

प्रतिनिधी /पणजी :

कोकण मराठी परिषद आणि कला अकादमी गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 15 रोजी सायं. 3.30 ते 5.30 वाजेपर्यंत ‘कालिदास महोत्सवा’चे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम कला अकादमीच्या कृष्णकक्षात होणार असून यावर्षीचा ‘कालिदास’ पुरस्कार माजी पत्रकार आणि ज्येष्ठ लेखक सुरेश वाळवे यांना देण्यात येईल. कार्यक्रमात कविसंमेलन आणि गुरुदास नाटेकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशनही होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत ऍड. रमाकांत खलप यांनी दिली.

यावेळी गुरुदास सावळ, सागर जावडेकर आणि चित्रा क्षीरसागर यांची उपस्थिती होती. कला व संस्कृती संचालनालयाचे सचिव दौलत हवालदार यांच्याहस्ते पुरस्कार देण्यात येईल तसेच पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात येईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या शिकेरकर करणार आहेत. पुरस्काराचे स्वरुप शाल, पुष्पगुच्छ, लामणदिवा आणि रोख रक्कम 5,000 रुपये असणार आहे.

कार्यक्रमात कविसंमेलन होणार असून ज्येष्ठ समिक्षक, साहित्यिक प्रा. कृष्णाजी कुलकर्णी अध्यक्षस्थान भूषवतील. कविसंमेलनात शुभदा च्यारी, सोनाली देसाई, मंगेश काळे, सोनाली सावळदेसाई, परेश नाईक, विद्या शिकेरकर, स्नेहा सुतार, विठ्ठल शेळके, मोतीलाल पेडणेकर, इंद्रजित शिरगांवकर, अनुराधा म्हापसेकर, गौतमी चौर्लेकर, माधव सटवाणी, आनंद मयेकर, कविता बोरकर, सुधाकर कुलकर्णी आणि सुनेत्रा कळंगुटकर यांचा समावेश असणार आहे.

यापुर्वी ‘कालिदास’ पुरस्कार एकूण 10 साहित्यिकांना देण्यात आले आहेत. त्यामध्ये विनायक खेडेकर, गजानन रायकर, गोपाळराव मयेकर, श्रीराम पांडुरंग कामत, सुदेश लोटलीकर, विष्णू सूर्या वाघ, गुरुनाथ नाईक, पुष्पाग्रज आणि एस. एस. कुलकर्णी या साहित्यिकांचा समावेश आहे.

Related posts: