|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मोदींनी देशाचा नावलौकिक जगात उंचावला

मोदींनी देशाचा नावलौकिक जगात उंचावला 

प्रतिनिधी /पणजी :

पंतप्रधान नरेंद मोदी यांचे परदेश दौरे, त्यावरील खर्चासाठी त्यांचे नाव गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवण्याची काँग्रेसची मागणी बालिश हास्यास्पद असून मोदींनी भारताचे नाव जगात उंचावल्याचा दावा भाजपने केला आहे. ते काही परदेशात सहलीसाठी गेले नव्हते असे सांगून काँग्रेसला 50 वर्षात जे जमले नाही ते मोदींनी 4 वर्षात करुन दाखवले असे भाजने म्हटले आहे.

पणजीत भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ते प्रेमानंद म्हांबरे व दत्तप्रसाद नाईक यांनी सांगितले की गेल्या 4 वर्षात 7 कोटीपेक्षा जास्त शौचालये बांधली, 1 लाखापेक्षा अधिक गावे ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्यात आली, 30 कोटी एलईडी बल्ब देशभरात लावण्यात आले, 31 कोटी जनधन खाती सुरु झाली ही सर्व कामे म्हणजे एक एक विक्रमच असून त्यासाठी मोदींचे नाव जरुर गिनिज वर्ल्ड बुकात नोंद झालेच पाहिजे असे नाईक व म्हांबरे यांनी नमूद केले.

ते म्हणाले की मोदी हे सध्या जगातील तिसऱया क्रमांकाचे नेते असून त्यांच्या परदेश दौऱयात हजारो लोक त्यांना भेटण्यासाठी स्वागतासाठी येतात. त्यामुळे त्यांची लोकप्रियता स्पष्ट होते. सर्व देशांशी जगभरात मोदी यांनी तेथील नेत्यांशी चांगले संबंध जोडले असून त्यामुळे व्यापार व इतर सर्व प्रकारचे करार शक्य झाले. परदेश दौरा तेथील भेटीमुळे भारताची प्रगती चौफेर जगभरात गेली असून भारतीयांना कोणत्याही देशात चांगला मान सन्मान मिळत आहे. मोदींमुळे हे सर्व शक्य झाले असून त्यांचा परदेश दौऱयाचा विपरीत अर्थ काढून काँग्रेसवाले जनतेची दिशाभूल करीत आहेत. तसेच त्यांच्यात फुट पाडत असल्याची टीका नाईक व म्हांबरे यांनी केली. मोदींच्या परदेश दौऱयांचे चांगले परिणाम दिसून आल्याचेही त्यांनी नमूद केले.

Related posts: