|Saturday, February 22, 2020
You are here: Home » leadingnews » प्रजासत्ताक दिनासाठी भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रण

प्रजासत्ताक दिनासाठी भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रण 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पुढील वषी साजरा होणारा प्रजासत्ताक दिन भारतासाठी खास ठरण्याची शक्मयता आहे. भारतानं प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रित केलं आहे. ट्रम्प यांनी भारताचं निमंत्रण स्वीकारल्यास ते मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचं मोठं यश असेल, असं मानलं जात आहे.

भारताकडून ट्रम्प यांना निमंत्रित केल्याची माहिती ’टाइम्स ऑफ इंडिया’च्या सूत्रांनी दिली आहे. यावषी एप्रिलमध्ये भारतानं ट्रम्प यांना निमंत्रण पाठवलं होतं. मात्र, त्यावर अमेरिकेकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. भारताच्या निमंत्रणावर ट्रम्प प्रशासन सकारात्मक विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत. ट्रम्प यांनी भारताचं निमंत्रण स्वीकारल्यास भारताच्या परराष्ट्र धोरणाचं हे मोठं यश असेल, असं बोललं जात आहे. याआधी 2015 मध्ये प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते.

 

Related posts: