|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मलेरिया, डेंग्यू रोगाबाबत जनजागृतीसाठी बैठक

मलेरिया, डेंग्यू रोगाबाबत जनजागृतीसाठी बैठक 

प्रतिनिधी/ म्हापसा

बार्देश तालुक्यातील व खास करून म्हापसा शहरात वेक्टर बोन डिसीज डेंग्यू, मलेरिया सारख्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने जनजागृती करण्यासंदर्भात मंगळवारी संध्याकाळी उत्तर गोवा उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. उपजिल्हाधिकारी गौरेश शंखवाळकर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, म्हापशाचे नगराध्यक्ष तसेच विविध खात्यातील अधिकारी, तसेच गट विकास अधिकारी क्रिष्णांत पांगम, गोवा कॅनचे पर्यवेक्षक, रॉलन्ट मार्टिन्स, ऍड. महेश राणे आदी उपस्थित होते.

म्हापशात गटारे योग्यरित्या साफ केलेली नाहीत. स्क्रॅपयार्डमध्ये वाढ तसेच सर्वत्र पार्क करून ठेवलेल्या वाहनांमुळे डासांची पैदास होते, असे म्हापसा आरोग्य खात्याचे अधिकारी आनंद हुम्रसकर यांनी सांगितले. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी मलेरिया रुग्णाबाबत आपला अहवाल सादर केला असता यंदा कांदोळी भागात सर्वात जास्त मलेरिया रुग्ण सापडल्याचे सांगण्यात आले. त्यात 4 मलेरियाचे रुग्ण तर काही डेंग्यूचे रुग्ण सापडल्याचे स्पष्ट केले. साळगाव 1, सांगोल्डा 1 तर 28 रुग्ण कळंगूटमध्ये आढळून आले आहेत. या भागात खास करून कांदोळी व कळंगूटमध्ये अचानक वाढ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

गोव्यात येणाऱया बिगरगोमंतकीयांकडे आरोग्य कार्डे उपलब्ध नसतात. त्याची चौकशी व्हायला हवी, असे गोवा कॅनचे रोलन्ड मार्टिन्स यांनी सांगितले. कोलवाळ आरोग्य केंद्राचे डॉक्टर म्हणाले की, कोलवाळ भागात डेंग्यू व मलेरियाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. यावर आळा घालण्यासाठी गावागावात शिबिरे आयोजित केली आहेत. कोलवाळ भागात 9 कंस्ट्रक्शन प्रकल्प सुरु आहेत. मात्र तेथे असे रुग्ण आढळून आले नाहीत, सांगण्यात आले.

बंद पडलेल्या कंस्ट्रक्शन साईडवर पाणी साचून मलेरिया, डेंग्यू सारखा आजार फैलावतो. अशा ठिकाणी नियमित औषधाचा फवारा करणे गरजेचे आहे, ए ऍड. महेश राणे यांनी सांगितले. नगरसेवकांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी मार्टिन रॉलन्ड यांनी केली.

यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच रोगाचा नायनाट करण्यासाठी पंचायत तसेच पालिका पातळीवर जी काही मदत पाहिजे ती पुरविली जाईल, असे आश्वासन उपजिल्हाधिकारी गौरीश शंकवाळकर यांनी दिले. म्हापसा आरोग्य खात्याने पालिका नगरसेवकांच्या सहकार्याने प्रत्येक वॉर्डात याबाबत जनजागृती करून गावागावात माहिती देण्याचा संकल्प केला आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. हुम्रसकर यांनी केले आहे.

म्हापसा परिसरात मलेरिया व डेंग्यू रुग्णात वाढ

आंगड, खोर्ली, कुचेली येथे मलेरिया व डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. हे  परिसर आरोग्य खात्याने संवेदनशील म्हणून नोंद केले आहेत. या आजाराची लागण स्थानिक लोकांना झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. मलेरिया व डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य खात्याने म्हापसा परिसरात औषध फवारणी मोहीम राबविण्यात आली आहे. नागरिकांनी स्वच्छतेकडे लक्ष केंद्रीत केले नसल्याचे आरोग्य खात्याला दिसून आले आहे, असे डॉक्टर हुम्रसकर यांनी सांगितले.

आरोग्य केंद्रातर्फे म्हापशातील शाळांच्या शिक्षकांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यांच्यामार्फत विद्यार्थ्याना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले जात आहे. परिसर स्वच्छ ठेवल्यास या रोगावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल, असा विश्वास हुम्रसकर यांनी व्यक्त केला.

Related posts: