|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » राज्यातील सिचंनासाठी केंद्राकडून 1 लाख 15 हजार कोटींची मदत

राज्यातील सिचंनासाठी केंद्राकडून 1 लाख 15 हजार कोटींची मदत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

दराज्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी तसेच रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राने 1 लाख 15 हजार कोटींच्या मदतीची घोषणा बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली. बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत केंद्राकडून ही मदत दिली जाणार आहे. यामुळे राज्याच्या सिंचन क्षमतेत 22 टक्क्मयांनी वाढ होणार आहे. केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

गडकरी म्हणाले, राज्यातील 91 प्रकल्पांसाठी केंद्राची ही महत्वाकांक्षी योजना असून त्यामुळे राज्याची सिंचनासाठी मोठी मदत होणार आहे. सिंचन क्षमतेतही यामुळे वाढ होणार असून सिंचन 18 टक्क्मयांवरुन 40 टक्क्मयांवर जाणार आहे. यामुळे राज्यातील 3 लाख 77 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. या योजनेंतर्गत अनेक अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत.

 

Related posts: