|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दूध आंदोलनाला हिंसक वळण, आज चक्काजाम

दूध आंदोलनाला हिंसक वळण, आज चक्काजाम 

प्रतिनिधी/ सांगली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाला तिसऱया दिवशी हिंसक वळण लागले. माळवाडी (ता. मिरज) येथे मुक्कामास असलेल्या दोन शहरी बसेसची स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. चालकासमोरील काचा फोडल्या. तर कवठेमहांकाळ येथे कृष्णा, अलकूड येथील खामकर डेअरीमघ्ये तोडफोड करण्यात आली. दूध ओतण्यात आले. तर म्हैसाळजवळ शिरगावे दूध डेअरीचा टँकर फोडण्यात आला. आंदोलनामुळे जिह्यात तिसऱया दिवशीही दूध संकलन ठप्प होते. दरम्यान, खा. राजू शेट्टी यांच्या आवाहानंतर आज चक्काजामचा इशारा देण्यात आला असून किणी टोलनाक्यावर जनावरांसह चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. 

दूध उत्पादकांना प्रतीलिटर पाच रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या तीन दिवसांपासून राज्यव्यापी दूध आंदोलनाची हाक दिली आहे. संपूर्ण राज्यासह जिल्हय़ातही या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवसांपासूनच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह दूध उत्पादकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईकडे जाणाऱया सर्व रस्त्यांवर ठाण मांडत दूधाची नाकाबंदी केली आहे.

दोन बसेसची तोडफोड

दरम्यान, पोलिसांनी स्वाभिमानीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह आंदोलक  उत्पादकांनी दूध टँकरबरोबरच एस. टी. व शहरी बसेस्नांही टार्गेट केले आहे. मंगळवारी तासगाव-कोल्हापूर एस.टी.वर दगडफेक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी माळवाडी (ता. मिरज) येथे मुक्कामी असणाऱया दोन शहरी बसेसची (एमएच 14-बीटी-1006 व एमएच 14 बीटी-1019) स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. यामध्ये दोन्ही बसचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या बसेसवर दगडफेक करत चालकांसमोरील काचा फोडण्यात आल्या आहेत.

दोन डेअऱया फोडल्या

आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जिह्यात दोन दूध डेअऱयांना टार्गेट करत त्या फोडल्या. दूधाची नासाडी केली. कवठेमहांकाळ येथील कृष्णा तसेच अलकूड येथील खामकर दूध डेअरींचा यामध्ये समावेश आहे. या दोन डेअऱयांमधून दूधाचे संकलन होत असल्याने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. तसेच शिरगावे दूध डेअरीचा एक टँकरही म्हैसाळजवळ फोडण्यात आल्याचे स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितले. टँकर पाठोपाठ आता दूध डेअऱयांनाही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी लक्ष केल्याने शहरात दूधाची चणचण भासू लागली आहे. दूध डेअरी चालकांनी या आंदोलनाचा धसका घेतला आहे.

दूध संकलन ठप्पच

आंदोलनाच्या सलग तिसऱया दिवशीही जिह्यातील दूध संकलन ठप्प होते. ग्रामीण भागात दूध संकलन झाले नाही. परिणामी मोठय़ा दूध संघ व संस्थामध्ये दूध आले नाही. जिह्याच्या ग्रामीण भागात दूध आंदोलनाचे पडसाद उमटू लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शांत असलेला दूध उत्पादक आता आक्रमक होऊ लागला आहे. दूध आंदोलनावर तोडगा निघत नसल्याने दूध उत्पादकांच्या सहनशीलता संपू लागली आहे. त्यामुळे आंदोलनाला हळूहळू हिंसक वळण लागत आहे. दरम्यान दूध दर प्रश्नी सरकार वेळकाढूपणा करत असल्याने खा. शेट्टी यांनी उद्या (गुरुवार) राज्याज चक्काजामची हाक दिली आहे. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आज किणी टोलनाक्यावर चक्काजाम

दूध आंदोलनाबाबात सरकार गंभीर नाही. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनावर तोडगा काढण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे दूध उत्पादकांच्यामधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, दूध आंदोलन अधिक आक्रमक करण्यात येईल. त्यासाठी आज किणी टोलनाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात सांगलीसह कोल्हापूर जिह्यातील दूध उत्पादक सहभागी होणार आहेत.

महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी

Related posts: