|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बाबूश मोन्सेरात, रोझी विरुद्ध 200 पानी आरोपपत्र

बाबूश मोन्सेरात, रोझी विरुद्ध 200 पानी आरोपपत्र 

प्रतिनिधी/ पणजी

कार्यालयात कामावर असलेल्या अल्पवयीन नेपाळी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी आमदार बाबूश मोन्सेरात व या प्रकरणात दलालाचे काम करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रोझी फेर्रोझ या दोघांवर गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी दोन वर्षानंतर पणजी सत्र न्यायालयात 200 पानी आरोपपत्र सादर केले आहे. या प्रकरणातील तिसरी आरोपी असलेली त्या मुलीच्या आईला साक्षीदार बनवण्यात आले आहे.

बलात्कार झालेल्या त्या पीडित मुलीचे वय 17 वर्षापेक्षा जास्त प<ण 18 वर्षांपेक्षा कमी असल्याने ती अल्पवयीन ठरते. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाडय़ाप्रमाणे पीडित मुलगी 17 वर्षांची असल्यास बाल कायद्याखाली संशयित आरोपीवर गुन्हा होऊ शकत नसल्याने या प्रकरणात बाबूश मोन्सेरात यांच्या विरुद्ध गोवा बाल कायदा व पोस्को कायदा लावण्यात आलेला नाही. त्यामुळे या प्रकरणातून अर्धे गांभीर्य कमी झाले आहे. पोलिसांनी दि. 4 मे 2016 रोजी गुन्हा नोंदवून घेताना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप लावून गोवा बाल कायद्याखालील कठोर कलमे लावण्यात आली होती.

मोन्सेरात 12 दिवस होते कोठडीत

दि. 5 मे 2016 रोजी बाबूश मोन्सेरात गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांसमोर शरण आले होते. त्यानंतर 12 दिवस त्यांना कोठडीत ठेवण्यात आले. या 12 दिवसात पोलिसांना एकही पुरावा शोधण्यास अपयश आल्याने 1 लाख रुपयांच्या हमीवर न्यायालयाने जामीन मंजूर केला होता तर संशयित आरोपी रोझी फेर्रोझ व त्या नेपाळी मुलाच्या आईला प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या हमीवर जामीनमुक्त करण्यात आले होते.

मुलीनेच केली होती तक्रार

 सदर अल्पवयीन नेपाळी मुलगी आपल्या प्रियकराबरोबर पळून जाण्याच्या तयारीत असल्याची चाहूल लागताच तिच्या आईने एका एनजीओच्या मदतीने तिला मेरशी येथील अपना घर या बाल सुधारगृहात पाठवले होते. तेथे त्या मुलीने बाल कल्याण समितीकडे तक्रार करून आपल्या आईनेच तिला 50 हजार रुपयांना बाबूश मोन्सेरात यांना विकले आहे. त्यात रोझी नामक महिलेचा मध्यस्थ म्हणून हात असल्याचा आरोप त्या पीडित मुलीने केला होता.

नशेची औषधे दिली शितपेयातून

नशेची औषधे शितपेयात मिसळून तिला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिला कार्यालयात कामाला ठेवण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, असे मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणात बाल कायद्याच्या कलम 8 (2) व (3) खालील आरोप व पोस्को कायद्याखालील आरोप गाळण्यात आले असले तरी भा. दं. सं. च्या 376, 328, 342, 370 (ए), 109, 120 बी या कलमाखालील आरोप अजून आहेत.

मुलगी अल्पवयीन असली तरी ती सज्ञान आहे. त्याखाली प्रकरण बाल न्यायालयाऐवजी पणजी सत्र न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या आरोपपत्राची प्रत 200 पेक्षा जास्त पानी असून एकूण 40 साक्षीदारांच्या जबान्या जोडण्यात आल्या आहेत.

या प्रकरणात आरोपी असलेली त्या मुलीच्या आईला माफीचा साक्षीदार बनवण्यात आले आहे. अपना घरातील कर्मचारी, समिती सदस्य, त्या मुलीच्या निकटच्या मैत्रिणी, पोलीस अधिकारी आदी मिळून सुमारे 40 साक्षीदार जोडण्यात आले आहेत.

 

Related posts: