|Thursday, December 5, 2019
You are here: Home » Top News » छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल-नक्षलवाद्यांमध्ये चकमक , 7 नक्षलींचा खात्मा

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल-नक्षलवाद्यांमध्ये चकमक , 7 नक्षलींचा खात्मा 

ऑनलाईन टीम /छ़त्तीसगड :

छत्तीसगडमध्ये सुरक्षा आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये 7 नक्षलवाद्याच्या खात्मा करण्यात जवानांना यश आले. यामध्ये तीन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे.

गुरुवारी (19 जुलै) सकाळी दंतेवाडा-बिजापूर सीमा परिसरात तिमेनर जंगलात या सात नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. शिवाय, घटनास्थळाहून मोठय़ प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. सध्याही परिसरात चमकम सुरू आहे.

परिसरात नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाली मिळाली. यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. शोधमोहीमेदरम्यान सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली.

 

Related posts: