|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Top News » मुंबईत अंडय़ाच्या दरात वाढ

मुंबईत अंडय़ाच्या दरात वाढ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईच्या घाऊक बाजारात अंडय़ाचे दर प्रतिडझन 80 रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत. म्हणजे एका अंडय़ाला साधारण 7 रूपये मोजावे लागणार आहेत.

अंडय़ाची मागणी सध्या जास्त प्रमाणात आहे आणि अंडय़ांचा पुरवढा मात्र कमी आहे. त्यामुळे अंडय़ाची किंमत वाढल्याचे म्हटले जात आहे. देशी अंडय़ांचे भावही 120 रूपये डझनवर पोहोचले आहेत.म्हणजेच देशी अंडय़ाची किंमत जवळपास 11 रूपये इतकी झाली आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे वातावरणात गारवा वाढल्याने अंडी खाण्याकडे लोकांचा कल वाढल्याने अंडय़ांची मागणी अचानक वाढली. तसेच पावसाळा असल्याने मासे आणि चिकन यांच्या दरांमध्येही वाढ झाल्याने नागरिकांनी पर्याय म्हणून अंडय़ाला पसंती दिल्याने अंडय़ांची मागणी अचानक वाढल्याचे व्यापाऱयांनी सांगितले.