|Thursday, August 22, 2019
You are here: Home » विविधा » किसानपुत्र आंदोलनाचे जळगावात शिबीर

किसानपुत्र आंदोलनाचे जळगावात शिबीर 

ऑनलाईन टीम / जळगाव :
किसानपुत्र आंदोलनाचे चौथे राज्य स्तरीय शिबीर ४ आणि ५ ऑगस्ट रोजी जळगाव येथे होणार आहे त्यात प्रामुख्याने सिलिंग, आवश्यक वस्तू व जमीन अधिग्रहण या तीन कायद्याविषयी चर्चा केली जाईल अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते अमर हबीब यांनी दिली. ते म्हणाले की, हे तीन कायदे रद्द केल्याशिवाय शेतकऱयांना खर्या अर्थाने स्वातंत्र्य मिळणार नाही म्हणून संवेदनशील किसानपुत्रांनी हे कायदे समजावून घेतले पाहिजे.
मुंबई, नागपूर आणि आळंदी (पुणे) येथे अशी शिबिरे झाली असून जळगावच्या शिबिरात प्रामुख्याने खान्देशातील किसानपुत्रांचा सहभाग असणार आहे.शेतकरीविरोधी कायदे हा या शिबिराचा मुख्य विषय आहे.
शिबिराचा तपशील सांगताना ते म्हणाले की, ४ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयातील वकील पायल गायकवाड ह्या उद्घाटन करतील. या प्रसंगी डॉ सुरेश पाटील (जळगाव) डॉ. शाम अष्टेकर (नाशिक) व अमर हबीब (आंबाजोगाई) हे मार्गदर्शन करतील. दोन दिवस  चालणाऱ्या  या निवासी शिबिरात सिलिंग, आवश्यक वस्तू व जमीन अधिग्रहण कायद्याविषयी विधीज्ञ मार्गदर्शन मार्गदर्शन करणार आहेत. त्यात ऍड प्रकाशसिंह पाटील (औरंगाबाद), आशिष पाटील(जळगाव), ऍड रंजन राजगोर (ठाणे), अनंत देशपांडे (पुणे), ऍड संध्या पाटील (औरंगाबाद), सतीश देशमुख (पुणे), प्रमोद चुंचुवार (मुंबई) व मकरंद डोईजड (पुणे) हे विषय मांडणार आहेत. या शिवाय दोन विषयावर गट चर्चा होईल. त्यात गजानन अमदाबादकर(वाशिम), मयूर बागुल (अमळनेर), डॉ आशिष लोहे(अमरावती) व राहुल बोरसे (धुळे) भाग घेणार आहेत.
औरंगाबाद हायकोर्टातील नामवंत वकील ऍड महेश भोसले व पुसद येथील जेष्ठ वकील ऍड सुभाष खंडागळे यांच्या भाषणांनी शिबिराचा समारोप होईल.