|Monday, January 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » नूलमध्ये रास्ता रोको

नूलमध्ये रास्ता रोको 

संतप्त प्रवासी, पालकांनी एस.टी रोखल्या

प्रतिनिधी/ गडहिंग्लज

गडहिंग्लज एस. टी आगारातील काही वाहक-चालकांच्या मनमानी काराभारामुळे नूलमध्ये प्रवासी, पालकांनी शुक्रवारी एस. टी रोखून चक्काजाम आंदोलन केले. गडहिंग्लज-नूलमार्ग खणदाळ, नांगनूर, कडलगे गावाना जाणारी एस. टी बसच्या वाहक-चालकांच्या अरेरावी वागणूकीमुळे प्रवासीच्या अनेक तक्रारी होवून सुध्दा या परिसरातील शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बसमध्ये न घेताच निघून जात असल्याने   संतप्त प्रवासी, पालकांनी नूलमध्ये चक्कामाज आंदोलन केले. युवराज शिंदे, सुनिल नांगरे, आदेश विचारे, नारायण पोवार, तौसिफ बुढाण्णावर, सागर मांजरे यांच्यासह प्रवासीनी यामार्गावरील सर्वच बसफे-या अडवून धरल्याने चक्कामाज आंदोलन केले. यावेळी आगारप्रमूख पी. के. पाटील, वाहतूक नियत्रंण राजू पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट घेतली. त्यावेळी वाहक-चालक यांच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्यास प्रवासी, पालकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. गैरवर्तणुक कर्मचा-यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर सर्व बसेस सोडण्यात आल्या.

Related posts: