|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गडहिंग्लजला देशव्यापी चक्काजाम आंदोलनास पाठिंबा

गडहिंग्लजला देशव्यापी चक्काजाम आंदोलनास पाठिंबा 

प्रतिनिधी/ गडहिंग्लज

परिवहन क्षेत्रातील मारक असलेली सरकारची धोरणे व दादागिरी या विरोधात 20 जुलैपासून लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, ट्रक्टर, बस वाहतुक संघटनेने बेमुदत देशव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारला आहे. या आंदोलनास गडहिंग्लज येथील तालुका मोटार मालक संघटना, वाळू वाहतुक संघटना, काळभैरी टेम्पो असोसिएशन, न्यू दसरा चौक चालक-मालक संघटना, मिनी डोअर, पिक-अप संघटना यासह अन्य वाहतूक संघटनेन आंदोलन यशस्वी करण्यासाठी मार्केड यार्ड येथे रास्ता रोको करून सहभागी झाल्या होत्या. यावेळी रमेश रिंगणे यांनी आंदोलनाची दिशा सांगताना म्हणाले, देशात डिझेल वाढ रद्द झाली पाहिजे. टोल प्रक्रियात पारदर्शी करावी, वे- बिलातील अडचणी यासह अनेक अडचणी वाहनधारकांची आ†िर्थक पिळवणूक होत असल्याने सरकारला वेळोवेळी निवेदन, विंनती करून सुध्दा दुर्लक्ष केल्याने देशभरात संघटनानी चक्काजाम आंदोलन सुरू केले असल्याची माहिती दिली. यावेळी कॉगेस पक्ष्याने आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी  तालुक्यातील मोटार, वाहतूकदार संघटनेचे विविध पदाधिकारी, आनंदा शिंगाडे, कलाप्पा मोर्ती, शौकत नदाफ, बसवराज डोणवडे, बाळू गाडवी, दिपक जामुणे, महेश गाडवी, शेखरआण्णा यरटी, उदयकुमार देसाई, पापा मुल्ला, उमेश गावळी, कृष्णा मिरजे, दुंडाप्पा पाटील, अशोक मोर्ती, पापा सय्यद यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Related posts: