|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » एफडीऐच्या संचालिका सरदेसाई यांच्यावर कारवाई करावी

एफडीऐच्या संचालिका सरदेसाई यांच्यावर कारवाई करावी 

प्रतिनिधी/ पणजी

 फॉर्मेलिनयुक्त मासळी प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ माजली असून अन्न व औषधी प्रशासनाच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांच्या विरोधात एफआयआर नोंद करावी अशी मागणी कांग्रेसने करुन आगशी पोलिस्थानकात काँगेस पक्षाने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असल्याचे यावेळी माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

 फॉर्मेलिनविरोधात सरकार कठोर पाऊले उचलताना दिसत नाही. जर सरकारने कठोर पाऊल उचलून दोषांवर कारवाई केली नाही तर कॉंगेस पक्ष उच्च न्यायालयात जाणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

 फॉर्मेलिनचा विषय गाजतात राजकीय पक्षांनी व एनजीओंनी आवाज उठवल्याने सरकारने परराज्यातील मासळीवर आयात बंदी घाताली आहे. मात्र तरी देखील मासळी काही प्रमाणात गोव्याचा मार्केटमध्ये दिसत आहे. सरकार मासळीचे ट्रक परत पाठविले अस सांगते पण प्रत्यक्षात ही मासळी जप्त करुन ती नष्ट करणे गरजेचे होते. जर ती फॉर्मेलिन युक्त असेल तर ती नष्ट करावी ती परत पाठविली जाते. जर बाजारामध्ये रसायनीक फळे आढळल्यास अन्न औषधी खात्यामार्फत ती जप्त करुन नष्ट केली जातात. मग अन्न व औषधी खाते मासळी नष्ट का करत नाही? या फॉर्मेलिनमुळे मासळी खाणाऱयांना कर्करोग होण्याची भिती जास्त आहे. त्यामुळे सरकारने राज्यातील जनतेच्या आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे, असे ही यावेळी फर्नाडिस यांनी सांगितले.

 अन्न व औषधी प्रशासनाने 12 जुलै रोजी राज्यातील मासळी मार्केटमध्ये धाड मारुन जप्त केलेल्या मासळीची तपासणी केल्यावर फॉर्मेलिन आढल्याचे विधान संचालिका ज्योती सरदेसाई यांनी केले होते. मात्र राज्यात खळबळ उडताच प्रयोगशाळेत या मासळीमध्ये मर्यादीत प्रमाणात फॉर्मेलिन असून काही प्रमाणात त्याचा मासळीत अंश असतो अशी दोन वेगवेगळी विधाने करुन जनतेचा आरोग्याशी खेळ केला आहे. या अहवालात फेरफार केला असल्याचे स्पष्ट होत आहे. अशी दिशाभूल विधाने करुन त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे सरदेसाई यांनी सेवेतून निलंबीत करुन त्यांच्यावर एफआयआर नोंद करावी अशी मागणी उत्तर गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष विजय भिके यांनी सांगितले. यावेळी प्रसाद आमोणकर व शंकर फडते उपस्थित होते.