|Monday, October 22, 2018
You are here: Home » Top News » सॅनिटरी पॅड जीएसटीतून मुक्त ; 88 वस्तू होणार स्वस्त

सॅनिटरी पॅड जीएसटीतून मुक्त ; 88 वस्तू होणार स्वस्त 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली:

जीएसटी परिषदेने शनिवारी सामान्य लोकांसह उद्योग जगताला चांगलाच दिलासा दिला आहे. 88 वस्तू आणि सेवांवरील कर कमी केला तर काही वस्तू करमुक्त केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सॅनिटरी नॅपकिन करमुक्त करण्यात आले आहे. सध्या यावर 12 टक्के कर आहे. हा कर रद्द करावा म्हणून महिलांची मागणी होती.

प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेच्या 28 व्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले आहेत. परिषदेने फोर्टिफाइड दुधावरील 18 टक्के कर कमी केला आहे. परिषदेने जीएसटी कायद्यात 46 दुरूस्त्यांना मंजुरी दिली. संसदेत त्या मंजूर करून घ्याव्या लागतील. नवे दर 27 जुलैपासून लागू होतील. कराचे हे दर कमी झाल्याने सरकारला 8 ते 10 हजार कोटींचा फटका बसेल. यापूर्वी परिषदेने 18 जानेवारीला 29 वस्तूंवरील 28 टक्के कर 18 टक्के केला होता. दरम्यान, उद्योग जगताच्या अडचणींवर विचार करण्यासाठी 4 ऑगस्ट रोजी परिषदेची आणखी एक बैठक होईल.

 

– यांवस्तूवरील जीएसटी काढण्यात आला आहेö

लाकडी मूर्ती, खडे नसलेल्या राख्या, रिझर्व्ह बँक किंवा सरकारने कुणाच्या स्मरणार्थ काढलेली नाणी सॅनिटरी पॅड, फोर्टिफाइड दूध, मार्बल, इत्यादी.

 

– रिव्हर्स चार्ज –

यावरील निर्णय हा वर्षभरासाठी लांबणीवर टाकण्यात आला आहे. रिव्हर्स चार्ज 30 सप्टेंबर 2019पर्यंत लांबणीवर टाकला. खरेदीदाराकडून कर घेऊन केंद्राकडे जमा करण्याची जबाबदारी विपेत्यावर आहे. व्यापारी अनोंदणीकृत व्यापाऱयाकडून खरेदी करत असेल तर कर जमा करण्याची जबाबदारी खरेदीदारावर असते. यालाच रिव्हर्स चार्ज म्हणतात.

– यांवस्तूवर 28 टक्के वरून 18 टक्के कर करण्यात आला आहे.-

वॉटर कुलर, हीटर, आइस्क्रीम फ्रीझर, व्हिडिओ गेम्स, लेदर वस्तू, पेंट, वॉर्निश, पुट्टी, लिथियम बॅटरी, पेन, अग्निशामक, हँड ड्रायर, कॉस्मेटिक्स, परफ्युम, सेंट, टेलर, फ्रिज, वॉशिंग मशीन, ज्यूसर-मिक्सर, व्हॅक्मयुम क्लीनर, शेव्हर-ट्रिमर, वॉटर हिटर, इस्त्री,

– यांवस्तूवर 18 टक्के ऐवजी 12 टक्के कर करण्यात आला आहे.-

ज्वेलरी बॉक्स, हँडिक्राफ्ट, बांबूचे फ्लोअरिंग, केरोसीनचा प्रेशर स्टोव्ह, झिप, काचेच्या कलाकृती, हँडबॅग, हँडमेड लॅम्प, सजावटीचे आरसे.

– यांवस्तूवर 18 टक्के ऐवजी 5 टक्के कर करण्यात आला आहेö

1,000 रूपयांपर्यंतचे बूट-चप्पल, इथेनॉल, ई-बुक्स,

– यांवर 12 टक्के ऐवजी आता 5 टक्के कर करण्यात आला आहे-

खतांच्या दर्जाचे फॉस्फेरिक ऍसिड, आयात केलेले युरिया, तोरण, हँडलूम, हातमागाचे गालिचे-सतरंज्या.

– छोटे व्यापारी –

93 टक्के व्यापाऱयांना याचा लाभ होणार आहे. वार्षिक 5 कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या व्यापाऱयांना तिमाही रिटर्न भरावा लागेल. मात्र कर दर महिन्याला भरावा लागणार असून, कंपोजझिशनचे व्यापारीही यात आहेत. 80 लाख व्यापाऱयांना (93 टक्के) फायदा होईल. सध्या 1.5 कोटींवर उलाढाल असणाऱयांना मासिक रिटर्न भरावा लागतो. यासाठी लागणारा रिटर्नचा फॉर्मही सोपा स्वरूपाचा करण्यात आला आहे.

– व्यावसायिकांसाठी –

वार्षिक 5 कोटींपर्यंत उलाढाल असल्यास तिमाही रिटर्नची मुभा देण्यात आली आहे.

– हॉटेल उद्योग –

यात आकारलेल्या टेरिफनुसार कर ठरवणार आहेत. आता घोषित रूम टेरिफवर (रॅक रेट) कर लागणार नाही. नवीन व्यवस्थेत ग्राहकांना आकारलेल्या प्रत्यक्ष दरावरच कर लागेल. सध्या रूम टेरिफ 7,500 वा जास्त असल्यावर 28 टक्क्मयांची तरतूद आहे. 2,500 ते 7,500 रुपयांपर्यंत दरावर 18 टक्के आणि 1,000 =2,500 रूपयांपर्यंतच्या दरावर 12 टक्के कर आहे.

– कंपोझिशन योजना –

मर्यादा एक कोटीवरून दीड कोटी वाढवण्यात आली आहे. वार्षिक उलाढालीची मर्यादा 1 कोटीहून दीड कोटी रूपये केली आहे. आता दीड कोटी मर्यादेतील ज्या व्यापाऱयांच्या उलाढालीत 10 टक्के पर्यंत सेवा अंतर्भूत असतील ते व्यापारीही कंपोझिशनचा पर्याय निवडू शकतील. सध्याच्या व्यवस्थेत सेवा अंतर्भूत असणारे व्यापारी कंपोझिशनमध्ये जाऊ शकत नाहीत.

Related posts: