|Sunday, September 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » नवख्या कलाकारांसोबत स्वानंद किरकिरेंचा अभिनय

नवख्या कलाकारांसोबत स्वानंद किरकिरेंचा अभिनय 

प्रख्यात अभिनेता अक्षयकुमारने ‘चुंबक’ चित्रपटाची प्रस्तुती करायची घोषणा सोशल मीडियावर अस्सल मराठीत केल्यापासून मराठी चित्रपटसफष्टीत या चित्रपटाचा बोलबाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा स्वत: अक्षयकुमारने प्रकाशित केल्यामुळे चित्रपटाची उत्सुकता अजूनच वाढायला लागली आहे. तसेच ‘चुंबक’ चित्रपटातील गाणी नुकतीच प्रकाशित करण्यात आली.

 त्यामधील पहिले गाणे खेचा खेची, गडबड गोची हे असून ते स्वत: स्वानंद किरकिरे यांनी गायले आहे. या गाण्याला ओमकार कुलकर्णी यांनी शब्दांकित केले असून साकेत कानेटकर यांनी संगीत दिले आहे. तर दुसरे गाणे चुंबक चिटक चिटकला चुंबक हे गाणे बॉलीवूडमधील आघाडीचा गायक दिव्या कुमार याने गायले आहे. त्याशिवाय मराठी चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री विभावरी देशपांडे हिने पहिल्यांदाच या चित्रपटाकरिता म्हणजे चुंबक चिकटला या शीर्षक गीताचे शब्द लिहिले आहेत. या गाण्यांची संगीत रचना अमर मंग्रुलकर यांची आहे. सुप्रसिद्ध गीतकार, गायक आणि अभिनेता स्वानंद किरकिरे, कोल्हापूरचा संग्राम देसाई आणि पुण्याचा साहिल जाधव हे दोन नवीन युवा कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. प्रमुख भूमिका असलेला स्वानंद किरकिरेंचा हा पहिलाच चित्रपट आहे. 27 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप मोदी यांनी केले असून अरुणा भाटीया, केप ऑफ गुड फिल्म आणि कायरा कुमार क्रिएशनच्या नरेन कुमार हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

स्वानंद किरकिरेने यांतील प्रसन्नाची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. सोलापूरमधील एका छोटय़ा गावातील गतिमंद आणि सरळसाध्या अशा व्यक्तीची ही भूमिका आहे. यातील तीन मध्यवर्ती व्यक्तिरेखांपैकी एक असलेली ‘डिस्को’ची  भूमिका संग्राम देसाई करत आहे. परराज्यातून आलेल्या आणि मुंबईत मोबाईल रिपेरिंगचे काम करणाऱया तरुणाची ही व्यक्तिरेखा आहे. ‘बाळू’ या चित्रपटातील तीन मुख्य व्यक्तिरेखांपैकी एक महत्वाचे पात्र. ही व्यक्तिरेखा साहिल जाधवने साकारली आहे. तो आपले एक छोटेसे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडतो आहे. त्यासाठी तो एका हॉटेलात वेटरचे काम करत आहे.