|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » चिखलीत डेंग्यूने बालकाचा मृत्यू

चिखलीत डेंग्यूने बालकाचा मृत्यू 

प्रतिनिधी /वास्को :

वास्को चिखलीतील रेजिना मुंडी हायस्कूलच्या पूर्व प्राथमिक वर्गातील पाच वर्षीय विद्यार्थ्याचा डेंग्यू तापाने मृत्यू झाला आहे. या शाळेत लोवर केजीच्या वर्गात शिकणारा हा बालक गेले आठ दिवस गोमेकॉमध्ये उपचार घेत होता. शाळेतील या मुलाच्या मृत्यूमुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कर्मचाऱयांमध्ये भीती वाढली आहे. मयत बालक चिखलीत वास्तव्य आलेल्या परप्रांतीय मजूर कुटुंबातील आहे.

शाळेतील अनेक मुलांना डेंग्यूची बाधा झाल्याचे काही दिवसांपूर्वीच उघडकीस आले होते. सदर आजाराची लक्षणे आढळून आल्याने शाळा व्यवस्थापन, माजी विद्यार्थी संघटना तसेच आरोग्य खात्याने विविध सुरक्षा उपाययोजना हाती घेतल्या होत्या. मागच्या पंधरा दिवसांपासून अनेक विद्यार्थ्यांनी रक्त तपासणी करून घेतलेली असून साधारण पंधरा विद्यार्थ्यांना डेंग्यू तापाची बाधा झाल्याचे उघडकीस आले होते. त्यातील चार प्रकरणे डेंग्यूचीच असल्याचे निष्पन्न झाले होते. यापैकी एक विद्यार्थी पूर्व प्राथमिक विभागातील लोवर केजीच्या वर्गातील आहे. त्याला डेंग्य़ूची लागण झाल्याने गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. गेले आठ दिवस त्याच्यावर उपचार चालत होते, परंतु शनिवारी रात्री त्याला मृत्यू आला.

परप्रांतीय मजुराचा मुलगा

मिळालेल्या माहितीनुसार सदर बालकाला ताप येत असल्याने व पोटातही दुखत असल्याने प्रथम चिखलीत कुटीर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला गोमेकॉत हलवण्यात आले होते. आठ दिवसांच्या उपचारानंतरही त्याची प्रकृती खालवत गेली व अखेर शनिवारी रात्री त्याला मृत्यू आला. काल सोमवारी त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. मुलाचे कुटुंब चिखलीतील नाकेरी भागात एका चाळीत राहते. त्याचे वडिल एका बांधकाम कंत्राटदाराकडे मजूरीचे काम करतात. जवळची शाळा असल्याने मागील महिन्यातच त्याला रेजिना मुंडी शाळेत दाखल करण्यात आला होते.

Related posts: