|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भूयारी मार्गाने कळसाचे पाणी मलप्रभेत वळविले

भूयारी मार्गाने कळसाचे पाणी मलप्रभेत वळविले 

उदय सावंत /वाळपई :

म्हादई पाणी लवादाचा निकाल अंतिम टप्प्यात येऊन ठेपला असतानाच कर्नाटकाने बेकायदेशीररित्या कळसाचे पाणी मलप्रभेत वळवून नेण्याचा प्रयत्न कणकुंबी भागात केला आहे. गोवा सरकार जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता संदीप नाडकर्णी, अतिरिक्त मुख्य अभियंता प्रेमानंद कामत व अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांनी काल सोमवारी कणकुंबी भागाला भेट देऊन पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. कर्नाटकने पुन्हा एकदा आपल्या कारवाया सुरू केल्याने गोव्याला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

जलसंपदा खात्याचे सहाय्यक अभियंता दिलीप नाईक, रविप्रसाद बांदेकर यांनी माऊली मंदिरापासून जवळपास साडेतीन किलोमीटर अंतरावर पायपीट करून भूयारी कालव्याच्या माध्यमातून कर्नाटकने कशा प्रकारे मलप्रभेत पाणी वळविले आहे याची घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

पाहाणीचा अहवाल सरकारला सादर

याबाबत बोलताना अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांनी सांगितले की, कर्नाटक सरकारने कळसाचे पाणी मलप्रभेत वळवून देण्यासाठी कशाप्रकारे कृती आरंभली आहे याचा अहवाल सरकारसमोर सादर करण्यात आला आहे. त्यानंतर यासंबंधी सरकार म्हादईप्रश्नी हितसंबंध जपण्यासाठी निर्णय घेणार आहे. कणकुंबी येथील रामेश्वर मंदिराकडे मलप्रभा व कळसा या दोन नद्यांचा उगम व्हायचा. 2006 मध्ये कळसा प्रकल्पाच्या कामाला सुरूवात झाल्यानंतर कर्नाटकने कळसाचे तीन किलोमीटरपेक्षा जास्त तर मलप्रभेचे पाच किलोमीटरपेक्षा जास्त पात्र पूर्णपणे उद्ववस्थ केले आहे.

Related posts: