|Thursday, September 19, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ‘ऑनर ९ एन’ भारतात लॉन्च

‘ऑनर ९ एन’ भारतात लॉन्च 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

चीनी स्मार्टफोन निर्माता हुआवेचा सब ब्रान्ड ‘ऑनर’नं भारतात आपला बजेट स्मार्टफोन ‘ऑनर ९ एन’ लॉन्च केलंय. हा स्मार्टफोन दोन मेमरी वेरिएन्टमध्ये लॉन्च करण्यात आलाय. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी वेरिएन्टची किंमत ११,९९९ रुपये तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी वेरिएन्टची किंमत १३,९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट किंवा कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवरून खरेदी केला जाऊ शकेल. 

‘ऑनर ९ एन’ची विक्री ३१ जुलैपासून सुरू होणार आहे. लॉन्च ऑफरमध्ये रिलायन्स जिओ २,२०० रुपयांचा कॅशबॅक देणार आहे. सोबतच १०० जीबी अॅडिशनल डाटा मिळेल तसंच १,२०० रुपयांचा मिंत्राचा वाउचरदेखील मिळणार आहे.