|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चेंबर ऑफ कॉमर्सची आज निवडणूक

चेंबर ऑफ कॉमर्सची आज निवडणूक 

बेळगाव / प्रतिनिधी

दि. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सच्या नूतन कार्यकारिणीची निवडणूक बुधवारी होणार आहे. विद्यमान संचालक मंडळाचे प्रतिनिधीत्व करणाऱया समृद्धी पॅनलला सदस्यांकडून पाठिंबा लाभल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या पॅनलच्या विजयाचा विश्वास  पॅनलच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.

यंदा चेंबर ऑफ कॉमर्सची निवडणूक घेण्याची वेळ आल्यामुळे उद्योजक आणि व्यावसायिक वर्गातून नाराजीचा सूर उमटला आहे. आपल्या कार्यपद्धतीनुसार दरवषी कार्यकारिणी निवडणे आणि सक्रिय सदस्यांना संधी देण्याची प्रथा आजपर्यंत जपण्यात आली आहे. परंतु काही नव्या सदस्यांनी या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे चेंबर ऑफ कॉमर्सच्या बिनविरोध निवडीचा प्रघात यंदा मोडीत निघाला आहे.

जुन्या जाणत्या आणि अनुभवी सदस्यांचा समावेश असणाऱया समृद्धी पॅनेलने ही आपली बाजू सदस्यांपुढे मांडली आहे. समृद्धी पॅनेलचे सदस्य असणारे राजेंद्र मुतगेकर, संजीव कत्तीशेट्टी आणि महेश बागी हे सदस्य यामधून निवडणूक लढवित आहेत.

यासंदर्भात बोलताना समृद्धी पॅनलचे ज्ये÷ सदस्य दिलीप तिळवे यांनी म्हटले की नियमानुसार नवीन सदस्यांना सामावून घेऊन आपण नवी कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया करून घेत आलो आहोत. बहुतांश सदस्यांनी आपला पाठिंबा समृद्धी पॅनेलच्या सदस्यांना दर्शविला असल्याचे त्यांनी सांगितले.

राजेंद्र मुतगेकर यांचे मत

चेंबरच्या माध्यमातून विकासात्मक कार्य करण्यावर  आपण सतत भर दिला आहे. चेंबरच्या स्वत:च्या वास्तूसाठी न्यू गुडसशेड रोड येथे जागा घेतली आहे. त्याचप्रमाणे उद्यमबाग येथील जागेचे लीज 29 वर्षांकरिता वाढवून घेतले आहे. याठिकाणी एक मोठे संकुल निर्माण करण्याचा आराखडा तयार आहे. चेंबरच्या माध्यमातून एक प्रशिक्षण केंद्र सुरू करून कुशल-अकुशल कामगारांसाठी प्रशिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम व्यावसायिक म्हणून असलेल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर आपण संस्थेसाठी भरीव कार्य केल्यामुळे आपल्याला सदस्यांचे पाठबळ निश्चित लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related posts: