|Sunday, January 19, 2020
You are here: Home » Top News » ऍम्बी व्हॅली बलात्कार प्रकरणः आरोपी सुरक्षारक्षकाला 10 वर्षाच्या शिक्षेसह 11हजारांचा दंड

ऍम्बी व्हॅली बलात्कार प्रकरणः आरोपी सुरक्षारक्षकाला 10 वर्षाच्या शिक्षेसह 11हजारांचा दंड 

ऑनलाईन टीम / पुणे :

लोणावळा येथील ऍम्बी व्हॅलीमध्ये राष्ट्रीय परिषदेसाठी दिल्ली येथून आलेल्या अकाऊंट एक्झीकेटिव्ह तरूणीवर बलात्कार झाल्याचा प्रकार 2010 मध्ये घडला. यातील आरोपी असलेल्या सुरक्षारक्षकाला न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरी आणि अकरा हजार रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोने यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षा झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव धमेंद्रकुमार रामबाबुल चौधरी उर्फ सिंग असे आहे. ही घटना 10 डिसेंबर 2010 रोजी घडली होती. पीडित तरूणी ही तिच्या खोलीत झोपली असताना आरोपीने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता. पिडीत तरूणी ही दिल्ली येथून एका कंपनीच्या कॉन्फरन्ससाठी अ‍Ÿम्बीव्हॅलीमध्ये आली होती. ती झोपली असताना आरोपीने तिच्या रूममध्ये प्रवेश केला आणि चाकूच्या धाकाने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने हा प्रकार तिच्या मैत्रिणीला फोन करून सांगितला होता. त्यानंतर तिने मुंबईला आई-वडिलांकडे गेल्यावर हा प्रकार सांगितला होता. त्यानंतर ही घटना उघड झाली होती. याप्रकरणी अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

Related posts: