|Monday, December 9, 2019
You are here: Home » leadingnews » माझ्या टेबलवर फाईल असती , तर मराठा आरक्षण दिले असते : पंकजा मुंडे

माझ्या टेबलवर फाईल असती , तर मराठा आरक्षण दिले असते : पंकजा मुंडे 

ऑनलाईन टीम / बीड :

माझ्या टेबलावर मराठा आरक्षणाची फाईल असती, तर क्षणाचाही विलंब न करता आरक्षण दिले असते, असे वक्तव्य राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. पंकजा मुंडे यांनी आज बीडमधील परळीत ठिय्या आंदोलन करणाऱया मराठा मोर्चेकऱयांची भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘तुमचा आक्रोश ऐकण्यासाठी आले आहे. मी तुम्हाला वाकायला सांगणार नाही. मी तुमची दूत बनणार आहे. तुमच्यासाठी मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांपर्यत जाणार आहे.मी शिवरायांची शपथ घेऊन सांगते की जर माझ्या टेबलवर मराठा आरक्षणाची फाईल असती, तर मी क्षणाचा विलंब न करता आरक्षण दिले असते’. आज मी तुम्हाला एक शपथ देण्यासाठी आले आहे. जीम गमवू नका, माझ्या वाघांनो जीव देऊ नका,जीव घ्या. आरक्षणासंदर्भात अधिवेशन घेण्यात मुख्यमंत्र्यांना मागणी करणार आहे.

 

Related posts: