|Thursday, January 23, 2020
You are here: Home » क्रिडा » विश्वचषकानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून स्टेनची निवृत्ती

विश्वचषकानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून स्टेनची निवृत्ती 

वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग

गेल्या दोन वर्षापासून दुखापतींमुळे चर्चेत असलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टीनने पुढील वर्षी होणाऱया विश्वचषक स्पर्धेनंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले. कसोटी क्रिकेटमध्ये मात्र शक्य होईल तोपर्यंत खेळत राहणार असल्याचे त्याने यावेळी स्पष्ट केले.

35 वर्षीय स्टेनने आपल्या वाढत्या वयाचा दाखल देत आगामी काळात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळणे शक्य होत नसल्याचे सांगितले. प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या विश्वचषक संघात मला स्थान मिळेल, असा आशावादही त्याने यावेळी व्यक्त केला. सततच्या दुखापतींमुळे वनडे क्रिकेट संघात स्थान मिळणे, कठीण झाले आहे. युवा खेळाडूकडून चांगली कामगिरी होत असल्याने वनडे संघातील स्थान टिकवणे हे मोठे आव्हान आहे. यातच वाढते वय लक्षात घेऊन मी आगामी विश्वचषकानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे स्टेनने यावेळी स्पष्ट केले.

कसोटी क्रिकेटविषयी स्टेन म्हणाला, ‘कसोटी क्रिकेट मात्र दीर्घ काळ खेळत राहीन. भारताविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात खाद्यांला दुखापत झाल्यामुळे संपूर्ण मालिकेला मुकावे लागले होते. यातून सावरणे अतिशय आव्हानात्मक ठरले. मात्र श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळून तंदुरुस्ती सिध्द केली आहे. अर्थात, बळी मिळवण्यासाठी मला झगडावे लागले खरे पण खडतर सरावानंतर मी पुन्हा योग्य ट्रकवर येईन, असा विश्वासही त्याने यावेळी व्यक्त केला.

Related posts: